मुक्ताईनगर

भाजपा नेत्या तथा भारत सरकारच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आलेल्या अश्लील, आक्षेपार्ह व मानहानीकारक वक्तव्याचा निषेध व्यक्त करत भारतीय जनता पार्टी, मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार तथा पोलीस निरीक्षक, मुक्ताईनगर यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले की, नंदुरबार येथील विजय चौधरी या व्यक्तीने केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविषयी अत्यंत अश्लील, अवमानकारक व बदनामीकारक भाषा वापरल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारचे वक्तव्य हे केवळ एका लोकप्रतिनिधीचा अपमान नसून सार्वजनिक जीवनातील महिलांच्या सन्मानावर घाला घालणारे असून समाजात चुकीचा संदेश देणारे आहे.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघासह राज्यातील लाखो नागरिकांच्या लोकप्रिय लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याविषयी करण्यात आलेल्या अशोभनीय वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या आहेत. अशा विकृत व समाजविघातक प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. यावेळी भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
याप्रसंगी राजेंद्र सवळे, अतुल महाजन, पंकज कोळी, चंद्रकांत भोलाणे, ललित महाजन, डॉ. प्रविण पाचपांडे, सचिन पाटील, माधुरी पाटील, कैलास वंजारी, विशाल झाल्टे, साधना ससाणे, नईम बागवान, सागर गंगतीरे, सुनीता भालेराव, भावना महाजन, वैशाली जाधव, शितल सापधरे, इंद्रायनी भोई, अनुराधा चौधरी, तृप्ती राणे, स्वाती भारंबे, नारायण चौधरी, प्रशांत महाजन, बापु ससाणे, लक्ष्मन सापधरे, बाळा चिंचोले, दत्ता जोगी, अंकुश चौधरी, पंकज पाटील, पंकज सरोदे, मयूर महाजन, सोपान झाल्टे, जुबेर अली, अनिस पटेल, विनायक पाटील, अतिक खान, जावेद खान, प्रशांत जंगले, उमेश राणे, योगेश चौधरी, ललित खडसे, जानकीराम पांडे, सुनिल श्रीखंडे, विजय शिरोळे, सोमनाथ पाटील, योगेश मनसुटे, सार्थक पाटील, जयेश कारले, लखीचंद जैन, ज्ञानेश्वर ढोले, प्रदीप गोंधळी, रायसिंग चव्हाण, संदीप पाटील शालिग्राम सोनवणे, दलपत भोई, विनोद चौधरी, देविदास दांडगे, सोपान धाडे, निलेश दैवे, राहील खान, सौरव सपकाळे आदी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आघाडी-सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.


