ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोटरीने घडवली रील मॅजिक सफर

0

 

जळगाव

येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टने बाल दिनानिमित्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर येथे नेऊन चित्रपट – लघुपट कसे तयार होतात याविषयी रोटरी रील मॅजिक सफर घडवून आणली.

रोटरी जळगाव वेस्टने टाकरखेडा येथील जिल्हा परिषद शाळा शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेतली आहे.रोटरी वेस्टतर्फे गेल्या तीन वर्षात अनेक सुविधांसह या शाळेत विविध कार्यक्रम व प्रकल्प देखील राबविले आहेत. याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वप्नवत वाटणाऱ्या चित्रपटसृष्टी व त्याच्या निर्मिती विषयी माहिती मिळावी म्हणून यंदा बालदिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे नियोजन केले होते.

छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम इन्स्टिट्यूट मधील स्कूल ऑफ फिल्म्स आर्ट्स अँड फोटोग्राफी येथे तेरे मेरे सपने या नावाने फिल्म मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. पाचवी ते सातवी मधील वीस विद्यार्थ्यांना तेथील विभाग प्रमुख प्रा. शिव कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रात्यक्षिकासह माहिती देत मार्गदर्शन केले.

यशस्वीतेसाठी अध्यक्ष विनीत जोशी, प्रकल्प प्रमुख प्रा. राजेंद्र देशमुख, नेहा जोशी, शिक्षक भारत सूर्यवंशी, सोनाली सूर्यवंशी व स्नेहल नाईक यांनी परिश्रम घेतले. रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष नितीन रेदासनी, ॲड. सुरज जहांगीर व नितेश मैदासनी, निखिल मिस्त्री यांचे उपक्रमासाठी सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.