बाजारात आली लाल भेंडी !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
सर्वाना हिरवी भेंडी सुपरिचित आहे . मात्र लाल भेंडी ? असेल यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही . परंतु लाल भेंडी बाजारात आली असून या भेंडीची जात विकसित करण्यात आली आहे. हिरव्या भेंडीसारखे या भेंडीचे गुण असून केवळ ती लाल रंगाची असल्याने तिला बाजारात बरीच मागणी आहे.

भारतीयांच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश

साधारणपणे भारतातील बहुतांश भागात हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो. परंतु आता ग्राहकांची मागणी बदलत आहे. हिरव्या रंगात मिळणाऱ्या भाज्या आता वेगवेगळ्या रंगात उपलब्ध केल्या जात आहेत. त्याही पूर्णपणे नैसर्गिक आहे. फक्त रंगामध्ये फरक आहे. आता बाजारात लाल भेंडी देखील दाखल झाली आहे. जरी हिरव्या रंगाच्या भेंडीचे फायदे असले तरी लाल रंगाची काशी लालिमा भेंडीत देखील लोह, जस्त, कॅल्शियम आणि मोठ्या प्रमाणात प्रथिने आहेत.

लाल भेंडीचे बियाणे कुठे मिळेल

वाराणसीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्चने हे लाल रंगाची भेंडी विकसित केली आहे. ही भेंडी आता उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये लागवड केली जात आहे. याठिकाणी मागणी असल्याचेही दिसत आहे. सुरुवातीला लाल रंगाच्या काशी ललिमा भेंडीच्या बियाणे उपलब्ध होण्याची मोठी समस्या होती. परंतू आता नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनने काशी लालीमा बियाणे shop.mystore.in वर उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलवरून बियाणे मागवून शेतकरी लाला भेंडीची लागवड करु शकतात. येत्या हंगामात म्हणजे 15 फेब्रुवारी ते 15 मार्चदरम्यान लाल भेंडीचे पीक घेऊ शकतात.

भेंडीला लाल रंग आला कुठून ?

लाल भेंडी ‘काशी लालिमा’मध्ये अँथोसायनिन आढळते. तर हिरव्या भेंडीमध्ये क्लोरोफिल असते. अँथोसायनिन हा लाल भेंडीचा घटक आहे. यामध्ये असणारे अँटी-ऑक्सिडंट शरीर निरोगी ठेवण्यासही मदत करते. काशी लालिमामध्ये फॉलिक अॅसिड आढळते. जे गर्भाशयात वाढणाऱ्या मुलाच्या मानसिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. या भेंडीचे नियमित सेवन केल्याने कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.

लाल भेंडीचे वैशिष्टये

नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माहितीनुसार, लाल भेंडीला बाजारात जास्त किंमत मिळाली आहे. लाल भेंडी ही हिरव्या भेंडीप्रमाणेच घेतली जाते. हिरव्या भेंडीच्या तुलनेत लाला भेंडीचे प्रति हेक्टरी उत्पादन थोडे कमी आहे.

लाल भेंडीमध्ये लोह, झिंक, कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.
काशी लालिमाची पेरणी 15 जून ते 15 जुलै या कालावधीत केली जाते.
3.5 ते 4 किलो बियाणे प्रति एकरसाठी वापरले जातात.
15 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत देखील 5 ते 6 किलो प्रति एकर याप्रमाणे लाल भेंडीची लागवड करता येते.
काशी लालिमाच्या बिया पेरल्यानंतर 45 दिवसात पहिली तोडणी केली जाते.
या जातीच्या प्रत्येक रोपातून 20 ते 22 भेंडीचे उत्पादन मिळते.
लाल भेंडीचे सरासरी उत्पादन 150 ते 180 क्विंटल प्रति हेक्टर मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.