Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकार्थ»लाडक्या बहिणींकडून ६८०० कोटींची वसुली करणार का?
    लोकार्थ

    लाडक्या बहिणींकडून ६८०० कोटींची वसुली करणार का?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 31, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    लाडकी बहीण योजनेतील अनेक घोटाळे समोर आले आहेत. लाडकी बहीण योजनेत लाखो अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. या महिलांवर आता कारवाई होणार का असा असा प्रश्न उपस्थित होत आहे. लाडकी बहीण योजनेत अनेक पुरुषांनीही लाभ घेतला आहे. १४ हजार पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांच्या नावावर आतापर्यंत ६८०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. दरम्यान, आता महिलांकडून वसुली होणार असल्याचे बोलले जात आहे.

    लाडकी बहीण योजनेत तब्बल ४२ लाख अपात्र लाभार्थ्यांना लाभ घेतला आहे. गेल्या ११ महिन्यात त्यांना दर महिन्याला १५०० रुपये दिले गेले आहेत. यासाठी एकूण ६ हजार ८०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे आता या महिलांवर कारवाई करावी का यावर चर्चा सुरु आहे.

     

    सरकारला आर्थिक फटका

    अपात्र अर्जदाराच्या स्वयंघोषणापत्राचा आधार घेऊन त्यांनी घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येणार असून त्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर विचारविनिमय सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. सरकार पातळीवरून घाई झाल्याने कोणीच अर्जातील माहितीची काटेकोरपणे पडताळणी केली नाही. यामुळे लाखो अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे सरकारला आर्थिक फटका बसला आहे.

    दरम्यान, ज्या १४ हजार पुरुषांनी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली लाभ घेतला आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु आता या जवळपास ४२ लाख अपात्र महिलांविरोधात सरकार कोणतं पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महिलांकडून पैसे वसूल केले जाणार का? त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार

    June 11, 2026

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif