चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्य़ात भद्रावती तालुक्यातील श्रीगणेशदत्त गुरूपंचायतन मंदिरात ७ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२४ गुरूमंदिर नागपूर प्रणित परम पूज्य समर्थ श्री विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्र भद्रावती चंद्रपूर, वणी व गडचिरोली यांचा संयुक्त विद्यमाने प.पु. धर्मभास्कर श्री सद्गुरूदास स्वामी महाराज व प.पू. श्री. ईंगोले स्वामी महाराज (गुरूजी) प्रेरनेतून दत्त जयंती उत्साहाचा कार्यक्रम साकार होणार आहे.
या प्रसंगी श्री दत्तजयंती उत्सव प्रित्यर्थ “गुरुचरित्र” या सिध्द ग्रथांचे पारायण आणि विविध कार्यक्रमाचे सुध्दा आयोजन करण्यात आले आहे. शहरातील तसेच तालुक्यातील होणाऱ्या दत्त नवरात्रोत्सवात सहकुटुंब व सहपरीवार उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.