जिल्ह्यात बंडखोरांनी थोपटले दंड!

भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी वाढली : राष्ट्रवादीच्या बंडखोरांची तलवार म्यान

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

  • जिल्ह्यातील ११ मतदार संघासाठी १३९ उमेदवार रिंगणात
  • सर्वाधिक २९ उमेदवार जळगाव शहर मतदार संघात
  • सर्वात कमी ८ उमेदवार चाळीसगाव मतदार संघात
  • निवडणूक रिंगणातून ९२ उमेदवारांची माघार

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून जिल्ह्यातील अकरा मतदारसंघात विविध पक्षांसह बंडखोरांची उमेदवारी कायम ठेवल्याने कुठे चौरंगी तर कूठे पंचरंगी लढत अटळ झाली आहे. बंडखोरांनी आपली उमेदवारी कायम ठेवत ‘दंड’ थोपटले असून जळगाव शहर मतदारसंघात माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, कुलभूषण पाटील, पारोळ्यात माजी खासदार ए. टी. नाना पाटील, अमोल शिंदे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शप) गटाला बंड थोपविण्यात यश आले आहे.

 

जळगाव शहरात २९ उमेदवार 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या 231 उमेदवारीपैकी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या दि. 4 नोव्हेंबर शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील 92 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार मतदार संघासाठी एकूण 139 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत. अशी माहिती निवडणूक शाखेमार्फत प्राप्त झाली आहे.

विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूकीच्या रिंगणातील उमेदवारांची संख्या (कंसात माघार घेतलेल्य उमेदवारांची संख्या) चोपडा-9 (7) रावेर-9 (14), भुसावळ-9 (7) जळगाव शहर-29 (8) जळगाव ग्रामीण-11 (6) अमळनेर-12(4), एरंडोल-13 (07), चाळीसगाव-8 (8) पाचोरा-12 (12) जामनेर-10 (12) मुक्ताईनगर-7 (17) याप्रमाणे आहे.

सोमवार दि. 4 नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील एकूण 11 विधानसभा मतदार संघात 231 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दरम्यान मघारीच्या अंतिम दिवशी एकूण 92 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघात 139 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 

चोपड्यातून सात उमेदवारांची माघार : नऊ रिंगणात

चोपडा- चोपडा विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याच्या शेवटच्या तारखेला एकूण सात उमेदवारांनी आपले सर्व नामनिर्देशन पत्र माघार घेतल्यामुळे आता नऊ उमेदवार रिंगणात आहेत.

नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर काल नामनिर्देशन पत्र माघारीच्या मुदतीचा शेवटचा दिवस होता. वीहित अंतिम वेळेपर्यंत गौरव चंद्रकांत सोनवणे, डॉ बारेला चंद्रकांत जामसिंग, जगदीशचंद्र रमेश वळवी, शुभम गिरीश विसावे, रुस्तम नासिर तडवी, भूषण मधुकर भिल, साहेबराव कौतिक सैंदाणे या सहा उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले आहेत.

नामनिर्देशन पत्र माघारीच्या मुदतीनंतर आता नऊ उमेदवार रिंगणात असून त्यांना निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार व उमेदवाराच्या पसंती क्रमानुसार चिन्ह वाटप करण्यात आले. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांना धनुष्यबाण, प्रभाकर आप्पा गोटू सोनवणे यांना मशाल, युवराज देवसिंग बारेला यांना हत्ती, सुनील तुकाराम भिल यांना हॉकी व बॉल, अमित शिराज तडवी यांना चिमणी, अमीनाबी रज्जाक तडवी यांना बॅट, बाळू साहेबराव कोळी यांना शिटी, संभाजी मंगल सोनवणे यांना कपाट तर हिरालाल सुरेश कोळी यांना ऊस शेतकरी या निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसिलदार सचिन बांबळे आणि विविध अधिकारी हजर होते.

 

पाचोरा भडगांव संघातुन 12 उमेदवारांची माघार

पाचोरा  – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमाची घोषणा झालेली आहे. 18 – पाचोरा विधानसभा मतदार संघातून सुमारे 25 उमेदवार यांच्याकडून 39 नामांकन पत्र दाखल होते त्यापैकी 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या छाननीत 24 उमेदवार यांचे अर्ज वैध असल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 रोजीच्या नियोजित वेळापत्रकानुसार 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यत हा निवडणूकीतून माघारीच्या शेवट चा दिवस असून सदर दिवशी 18 – पाचोरा विधानसभा मतदार संघामध्ये एकुण 12 उमेदवार यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी मागे घेत विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतून माघार घेतली आहे.

त्याचा तपशिल खालील प्रमाणे – उत्तमराव धना महाजन (स्वाभीमानी पक्ष), अफसर अकबर तडवी – अपक्ष, नरेद्रसिंग मुख्यारसिंग सुर्यवंशी (अपक्ष), नितीन नामदेव पाटील (अपक्ष), पुजा अमोल शिंदे (अपक्ष), संजय ओंकार वाघ (अपक्ष), विजय नरहर पाटील (अपक्ष), सचिन अशोक सोमवंशी (अपक्ष), शेख राजु शेख सलीम – (अपक्ष), साबीर खान शब्बीर खान – (अपक्ष), संदिप फकीरा जाधव (अपक्ष), हरिभाऊ तुकाराम पाटील (अपक्ष) या 12 उमेदवारांनी माघार घेतली आहे. 18 – पाचोरा विधानसभा मतदार संघातुन एकुण 12 उमेदवार निवडणूक लढवित आहे. सदर उमेदवार यांचा तपशिल खालील प्रमाणे असे – किशोर धनसिंग पाटील – शिवसेना (धनुष्य बाण), वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे – (मशाल), सतिष अर्जुन बिऱ्हाडे – बहुजन समाज पार्टी (हत्ती), अमित मानखाँ तडवी – वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), प्रताप हरी पाटील – महाराष्ट्र स्वराज्य पक्ष (सप्त किरणांसह पेनाची निब), मांगो पुंडलिक पगारे – बहुजन महापार्टी (कॅरम बोर्ड), अमोल पंडीतराव शिंदे – अपक्ष (गन्ना किसान), अमोल शांताराम शिंदे – अपक्ष (रोड रोलर), निळकंठ नरहर पाटील – अपक्ष (बॅट), मनोहर आण्णा ससाणे – अपक्ष (नागरिक), दिलीप ओंकार वाघ – अपक्ष (शिट्टी), वैशाली किरण सुर्यवंशी – अपक्ष (ऑटो रिक्षा) असे 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

 

मुक्ताईनगर विधानसभेसाठी 17 उमेदवार रिंगणात

मुक्ताईनगर – मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवार रिंगणात राहणार आहेत तर काल माघारीच्या दिवशी 7 उमेदवारांनी स्वतःच्या इच्छेने माघार घेतलेली आहे. काल मुक्ताईनगर तहसील कार्यालय येथे सकाळपासूनच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची लगबग होती. दुपारी तीन वाजेपर्यंत 7 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. तसेच सायंकाळपर्यंत 17 उमेदवारांना चिन्ह वाटपाचे कामकाज सुरू होते.

माघार घेतलेले उमेदवार पुढील प्रमाणे : जितेंद्र पांडुरंग पाटील (रा. भालोद, ता. यावल), सुरेश शिवराम ठाकरे (रा. थोरगव्हाण, ता. रावेर) कांडेलकर संजय प्रल्हाद (रा. मुक्ताईनगर), कांडेलकर प्रतिभा संजय (रा. मुक्ताईनगर), रवींद्र एकनाथ बावस्कर (रा. कोल्हाडी, ता. बोदवड), सागर प्रभाकर पाटील (रा. बोदवड), सुरयाबानो दगडू शाहा (रा. सावदा, ता. रावेर) असे एकूण मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेले 7 उमेदवार आहेत.

 

एरंडोल पारोळा मतदारसंघात 13 उमेदवार रिंगणात

पारोळा – एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात काल अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 20 पैकी 7 उमेदवारांनी माघार घेतली असून या मतदारसंघात आता 13 उमेदवार रिंगणात आहेत.

यात शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील, शिवसेना शिंदे गटाचे अमोल पाटील, तसेच अपक्ष म्हणून संभाजीराजे पाटील, ए टी नाना पाटील, भगवान महाजन, डॉ हर्षल माने, अमित पाटील, अरुण जगताप, स्वप्निल पाटील, दत्तु पाटील, सुनिल मोरे, अण्णासाहेब सतीश पवार, प्रशांत पाटील स्वाभिमानी पक्ष यांनी आप आपली उमेदवारी कायम ठेवली आहे

अपक्ष उमेदवारांची मात्र या मतदारसंघात भाऊ गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे या भाऊ गर्दीत कोणाचे नशीब बलवत्तर हे येणार काळच ठरवेल तो पर्यंत मात्र वाट पाहावी लागणार आहे या सर्व उमेदवारांना काल चिन्ह वाटप करण्यात आले.

13 पैकी 6 उमेदवारांत खरी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे यात डॉ सतीश पाटील, अमोल पाटील, ए टी नाना पाटील, डॉ संभाजीराजे पाटील, भगवान महाजन, डॉ हर्षल माने, यांच्यात एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात खरा सामना रंगणार असल्याचे माघारी नंतर चित्र स्पष्ट झाल्याने सांगितले जात आहे.

 

अमळनेरात माघारी नंतर 12 उमेदवार रिंगणात

अमळनेर  – अमळनेर विधानसभा निवडणूकीसाठी एकुण 16 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोमवारी 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत एकुण 4 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे 12 उमेदवार जरी निवडणुकीच्या रिंगणात असले तर खरी लढत ही तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यात काँग्रेसकडून डॉ. अनिल नथ्थु शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अनिल भाईदास पाटील, अनिल भाईदास पाटील (अपक्ष), सचिप अशोक बाविस्कर (अपक्ष), अमोल रमेश पाटील (अपक्ष), छबिलाल लालचंद्र भिल (अपक्ष), निंबा धुडकू पाटील (अपक्ष), प्रतिभा रवींद्र पाटील (अपक्ष), यशवंत उदयसिंग मालची (अपक्ष), रतन भानू भिल (अपक्ष), शिरीष हिरालाल चौधरी (अपक्ष), शिवाजी दौलत पाटील (ऑटो रिक्षा) असे एकूण बारा उमेदवार आहेत. तर कैलास दयाराम पाटील, अशोक लोटन पवार, जयश्री अनिल पाटील, प्रथमेश शिरीष चौधरी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

 

रावेरमध्ये 9 उमेदवार रिंगणात : 14 उमेदवारांची माघार

रावेर – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी 23 पैकी 14 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता नऊ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. निवडणूक निरीक्षक अरुणकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रण धुमाळीत असलेले उमेदवारांना निवडणूक अधिकारी बबनराव काकडे यांनी चिन्ह वाटप केले.

रावेर विधानसभा निवडणुकीत खरी लढत भाजपा, काँग्रेस, प्रहार जनशक्ति पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवार यांच्या मध्ये होणार आहे. विधानसभेचे रणशिंग फुंकणारे उमेदवार अमोल हरीभाऊ जावळे (भाजपा) धनंजय शिरीष चौधरी (काँग्रेस) नारायण हिरामण अडकमोल (बसपा) अनील छबिलदास चौधरी (प्रहार जनशक्ति पार्टी) आरिफ खालिक शेख ( ऑल इंडिया मजलिस पार्टी)खल्लोबाई युनूस तडवी (ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी मुस्ताक कमाल मुल्ला (आजाद समाज पार्टी)शमिभा भानुदास पाटील (वंचित बहुजन आघाडी)दारा मोहंमद जफर मोहंमद (अपक्ष) असे नऊ उमेदवार रिंगणात आहेत. शेवटच्या दिवशी माघार घेणा-यांमध्ये सुरेश गुलाब बोदडे, उमा विठ्ठल भिल, संजय अर्जुन चौधरी, नुरा तडवी, धीरज अनिल चौधरी, नंदिनी अनिल चौधरी, अबाज फकिरा तडवी, वामनराव भालचंद्र जडे, गंगाराम महेंद्र बान्हे, दिवाकर वाणी, शोहिखान मुस्तफा तडवी, शेख कुर्बान शेख करीम, संजय हमीद तडवी, हर्षा अनिल चौधरी, यांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे.

निवडणूक चिन्ह वाटप प्रसंगी अनिल चौधरी व दारा मोहम्मद हे उमेदवार उपस्थित होते तर बाकी उमेदवारांचे प्रतिनिधी सुरेश धनके, पद्माकर महाजन, सी एस पाटील, पी के महाजन, ऍड सूर्यकांत देशमुख, राजीव पाटील, रमेश पाटील, ज्ञानेश्वर महाजन, आसिफ मोहम्मद, धीरज चौधरी, ईश्वर जाधव, महेश तायडे आदी उपस्थित होते. या प्रक्रियेत सहाय्यक निवडणूक अधिकारी बंडू कापसे, मोहनमाला नाझीरकर यांच्यासह नायब तहसीलदार संजय तायडे, किशोर पवार, अतुल गांगुर्डे, आर डी पाटील, संतोष विनांते, मनोज खारे, राजेंद्र फेगडे, हबीब तडवी, जगदीश गुरव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कामकाज पार पाडले.

 

चाळीसगावात 8 उमेदवार आखाड्यात : 8 ची माघार

चाळीसगाव  – विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील आठ उमेदवारांनी माघार घेतल्याने अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एकुण आठ जण विधानसभेच्या रिंगणात असून महायुती विरुद्ध मविआ अशी थेट लढत रंगणार आहे.

यानिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. एकुण 19 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. छाननी प्रक्रियेत तिघांचे अर्ज बाद झाल्याने 16 जण रिंगणात होते. माघारीच्या प्रक्रियेत सोमवारी विकास चौधरी, शरद सोनवणे, योगेश्वर राठोड, दिलीप पाटील, प्रकाश मोरे, रुपाली पाटील, मुखतारखान बिस्मिलाहखान कुरेशी, संपदा पाटील या उमेदवारांनी माघार घेतली.

भाजप महायुतीकडून विद्यमान आ. मंगेश चव्हाण तर मविआकडून उबाटा गटाचे उन्मेष पाटील रिंगणात आहे. यासोबतचं बहुजन समाजपार्टीचे राजाराम मोरे, वाल्मिक गरुड, संदीप लांडे, किरण सोनवणे, मंगेश कैलास चव्हाण, सुनील मोरे यांची उमेदवारी कायम आहे.

 

भुसावळात 9 उमेदवारांमध्ये लढत होणार

भुसावळ  – भुसावळ विधानसभा निवडणूकीसाठी आज माघारीच्या दिवशी सात जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता निवडणूकीसाठी 9 उमेदवार यांच्या लढत होणार आहे. यात भाजपचे आमदार संजय सावकारे, काँग्रेसचे डॉ. राजेश मानवतकर आणि वंचितचे जगन सोनवणे यांच्या खरी तिरंगी लढत होणार आहे.

निवडणूकीतून 7 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर उर्वरित 9 जणांना निवडणूकीचे चिन्ह वाटप करण्यात आले. माघारीमध्ये निलेश प्रभाकर बोदडे, पुष्पा जगन्नाथ सोनवणे, प्रशांत मनोहर तायडे, भुपेश विश्राम बाविस्कर, ॲड. प्रविण नाना सुरवाडे, शेख रहिम शेख अहमद व रविंद्र बळीराम सपकाळे यांचा समावेश आहे.

निवडणूकीच्या रिंगणात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार डॉ. राजेश तुकाराम मानवतकर, भाजपाचे उमेदवार आ. संजय वामन सावकारे, बहुजन समाज पार्टीचे राहुल नारायण बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे जगन्नाथ देवराम सोनवणे तर अपक्ष म्हणून अजय जीवराम इंगळे, गौरव धनराज बाविस्कर, जगदाळे प्रतिभा सुजित, सुशिल ज्ञानेश्वर मोरे, स्वाती कुणाल जंगले असे नऊ उमेदवार रिंगणात आहेत.

 

जामनेरात 10 उमेदवार मात्र दोन मातब्बरांमध्येच लढत

जामनेर – जामनेर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 22 उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 12 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले असून 10 उमेदवार निवडणूक मैदानात असून खरी लढत भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री गिरीश महाजन व महाविकास आघाडीचे दिलीप खोडपे यांच्यात होणार आहे.

जामनेर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 22 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी माघारीच्या शेवटच्या दिवशी एकूण 12 उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतली असून 10 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहे. त्यामध्ये दिलीप बळीराम खोडपे, (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट) गिरीश दत्तात्रय महाजन, (भारतीय जनता पार्टी) विशाल हरिभाऊ मोरे, (बहुजन समाजवादी पार्टी) अण्णासाहेब रामचंद्र राठोड, ( हिंदू समाज पार्टी ) प्रभाकर पंढरी साळवे, (राष्ट्रीय समाज पक्ष) मदन शंकर चव्हाण, (भारतीय जन सम्राट पार्टी) अनिल रंगनाथ पाटील, (अपक्ष) दिलीप मोतीराम खामनकर, (अपक्ष) राजेंद्र सुभाष खरे, (अपक्ष) राहुल राय अशोक मुळे, (अपक्ष) आधी उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.

एकूण 12 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामध्ये आत्माराम सुरसिंग जाधव, ज्ञानेश्वर गोपीचंद चव्हाण, जितेंद्र पांडुरंग पाटील, जितेंद्र श्रावण पाटील, दीपक सिंह, शांतीलाल राजपूत, नितीन स्वरूपचंद नाईक, परवेज आलम, अब्दुल रशीद शेख, पुना पुंडलिक शेजुळे, प्रशांत भीमराव पाटील, मोहम्मद समीर युनूस खान, हुसेन युसुफ तडवी आदींनी माघार घेतली आहे. जामनेर विधानसभेसाठी खरी लढत भारतीय जनता पार्टीचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिलीप खोडपे यांच्यामध्ये होणार.

Leave A Reply

Your email address will not be published.