Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»शैक्षणिक»वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    शैक्षणिक

    वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण

    मू.जे महाविद्यालयात मराठी विभाग आणि साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळ आयोजित वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 15, 2026No Comments42 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    मूळजी जेठा महाविद्यालयातील मराठी विभाग आणि साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळ आयोजित भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा जयंती आणि वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी साहित्यिक चंद्रकांत चव्हाण, मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. योगेश महाले, मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील, साहित्य कला व सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख डॉ. पुरुषोत्तम महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

    प्रमुख अतिथी चंद्रकांत चव्हाण यांनी आपल्या मनोगतात, विद्यार्थ्यांना चांगल्या लेखकांचे लेखन समजून घेणे महत्त्वाचे असून आजच्या पिढीने आपली वाचनाची आवड वृद्धिंगत करणे गरजेचे असल्याचे म्हटले. तसेच व्यक्तीने जीवननिष्ठांकडून मूल्यनिष्ठांकडे नेणारे साहित्य हे माणसाच्या जीवनात निश्चित आमुलाग्र बदल घडवल्याचेही सांगितले. आजच्या वर्तमानात तरुण पिढीने स्वतःला वाचनात गुंतवून घेऊन सर्जनशीलतीकडे वळणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ग्रंथ जीवन जगण्यास सहाय्यभूत भूमिका बजावतात तसेच युवा पिढीने आपले जीवनानुभव प्रत्यक्ष भाषेतून व्यक्त करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.

    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. योगेश महाले यांनी मराठीतील आदर्श व्यक्तिमत्त्वांची चरित्र- आत्मचरित्र वाचणे ही युवा पिढीची गरज आहे. वाचनातूनच व्यक्तिमत्व विकसित होते आणि त्यातूनच ग्रंथांचा लळा लागतो. समृद्ध ग्रंथ हे आपल्या जीवनात नक्कीच व्यक्तिमत्वात परिवर्तन घडवत असल्याचे म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख डॉ. पुरुषोत्तम महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. वर्षा उपाध्ये यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. विलास धनवे, प्रा. गोपीचंद धनगर यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif