Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»लोकशाही विशेष»पुस्तके वाचा, श्रीमंत व्हा..!
    लोकशाही विशेष

    पुस्तके वाचा, श्रीमंत व्हा..!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 14, 2026No Comments74 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही विशेष लेख

    आजच्या मोबाईल आणि डिजिटल युगात मुलांनी पुस्तकांशी वाचनाचे नाते जोडणे अत्यंत गरजेचे आहे. वाचनामुळे मन व शरीर तंदुरुस्त राहतेच, शिवाय संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वासही विकसित होतो. प्रत्येक दिवशी विचार करा की, आज तुमच्याकडे एक नवी संधी आहे. वारंवार वाचल्याने मुलांना नवीन शब्द शिकण्यास मदत होते व दैनंदिन जीवनात येणाऱ्या प्रसंगांशी व अडचणींशी सामना करण्याची क्षमता वाढीस लागते. प्रत्येकाने दररोज किमान काही वेळ वाचनासाठी द्यावा. आजच्या डिजिटल युगात युवकांनाही पुस्तकवाचनास प्रोत्साहन द्यावे. आजचा युवकच सशक्त समाज घडवू शकतो.

    भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये वाचन प्रेरणा दिवस म्हणून आपण साजरा करीत असतो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी आपल्या वाचन कौशल्याने भारताचे नाव जगभर उज्ज्वल केले. त्यांचा वाचनाप्रति असलेला समर्पणभाव, शिस्त, एकाग्रता, नम्रता आणि देशप्रेम आजही प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी आहे. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी केवळ गुणवत्ता नव्हे, तर सातत्यपूर्ण वाचन, मेहनत आणि जिद्द आवश्यक असते, हा संदेश त्यांच्या जीवनातून मिळतो.

    आजच्या या आधुनिक जगात आपल्या आत खोलवर डोकावून पाहिले, तर कुठला ना कुठला प्राणी सक्रिय दिसून येईल. हा प्राणी जागा होतो आणि बाहेरच्या वर्तनावर ताबा मिळवितो, तेव्हा माणूस प्राण्यासारखा वागू लागतो. भारतीय परंपरेने त्याला आवर घालण्यासाठी समर्थ रामदासांनी शिवगीता, गुरूगीता, गर्भगीता, उत्तरगीता, वेद आणि वेदांत इत्यादी नाना ग्रंथांचा सार श्रीमत दासबोध या ग्रंथामध्ये लिहिला. तसेच ज्ञानेश्वरी ग्रंथ, तुकाराम गाथा अशा विविध ग्रंथांचे संतांनी त्यांच्या अनुभवातून व संत परंपरेनुसार लेखन केले.

    एक छोटेसे पुस्तक आपल्याला वाचनामुळे नैतिक बनवते व वाचनामुळे आपल्या जीवनात आपुलकी निर्माण होते. आपल्या हाकेने आपले लोक लगेच धावून येतील, अशी हाक आता जिभेतून निघणेच बंद झाले आहे. कारण आपली आपुलकीच कुठेतरी हरवून गेली आहे. वाचन व त्या वाचनावर चिंतन करणे हे अतिशय गूढ व खोल तत्त्वज्ञान आहे. वाचनामुळे आपण अचानक स्वतःच्या आत एक शुद्धता व श्रीमंती अनुभवतो.

    वाचनातून तरुण वयात चारित्र्य समजून घ्या. आजकाल विशेषतः नवी पिढी प्रचंड मेहनत, परिश्रम करीत आहे; पण परिश्रमासोबतच शिक्षण, योग्यता, नम्रता व संस्कारांचे तेजही वाचनाच्या सवयीमुळे त्यात मिसळावे लागेल. कारण आपण वाचनातून संस्कार स्वीकारतो, तेव्हाच आपल्यात आत्मविश्वास, संयम आणि योग्यता ठामपणे उभी राहू शकते. विशेषतः बालवयापासूनच वाचनाचे महत्त्व समजून घ्या आणि आपल्या वाचनसंस्कृतीचा योग्य वापर करा. वय निघून जात असते. कोणताही काळ इतका सुंदर नसतो की तो आयुष्यभर थांबून राहील. म्हणून बालवयापासूनच वाचनाचे सातत्य टिकवून आपण अभ्यासाची गोडी निर्माण करू शकतो.

    वाचनामुळे आपल्याला नवीन गोष्टी समजून येत असतात व आपल्यात प्रचंड सामर्थ्य निर्माण होत असते. जीवनात कोणत्याही गोष्टींचा अंत नसतो. या स्पर्धेच्या युगात बदल खूप वेगाने होत आहेत. त्यामुळे जे काही काम कराल, ते त्याच्या सर्वोच्च शिखरापर्यंत घेऊन जा; मात्र त्यानंतरही बदलांबाबत जागरूक राहा. जसे की, कोणत्याही कलाकाराचे सादरीकरण संपते; पण कला शिल्लक राहते. त्यानुसार वाचन केल्यामुळे वाचनाची आवड निर्माण होते व ती वाचनाची आवड कधीच संपत नाही, ती निरंतर असते.

    वाचनामुळे आजचा युवक हा यशस्वी तर होतोच; पण मौल्यवानसुद्धा होत असतो. धनसंपत्तीमुळे श्रीमंत दिसणे कठीण; पण वाचनामुळे श्रीमंत दिसणे सोपे आहे. खरी धनसंपत्ती ही वाचन केल्यामुळेच बनत असते. छोटी-छोटी पावलेही प्रगतीच असतात. वाचन सातत्याने करीत राहा व पुढे जात राहा.

    वाचनामुळे आपण काही काळापूर्वी कुठे होतो आणि आज आपण कुठपर्यंत आलो आहोत, याकडे लक्ष दिल्यास आपला आत्मविश्वास वाढतो. पुढे टाकलेले प्रत्येक छोटे पाऊल हे देखील प्रगतीच असते. आता आणखी शक्य नाही, तेव्हाच आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करा. आणखी एक पान वाचणे, आणखी पाच मिनिटे सराव करणे, हेच अतिरिक्त प्रयत्न माणसाला इतरांपेक्षा वेगळे बनवितात. त्यामुळे असामान्य यश हे दररोज अतिरिक्त वाचनाच्या प्रयत्नातून मिळत असते. म्हणूनच वाचन करण्यातूनच उपाय सापडत असतो.

    प्रत्येक आव्हानावर काही ना काही मार्ग नक्की असतो, हा विश्वास कायम ठेवला, तर विचार करण्याची पद्धत बदलते. वाचन करणारा माणूस हा उपायापर्यंत पोहोचतो. वाचनामुळे आत्मविश्वास निर्माण होतो व यशाचा पाया विश्वास असतो.

    आजच्या या स्पर्धेच्या युगात वाचन हे अत्यंत गरजेचे आहे; कारण संपूर्ण जग फिरण्यासाठी वाचन हे सर्वात स्वस्त तिकीट आहे. एकदा का तुम्ही वाचनाचा सराव सुरू केला, की ते स्वतःच मनात नवीन प्रेरणा निर्माण करते. वाचनाचा छंद किंवा आवड कधीच सोडू नका; कारण तीच तुमची ओळख व ज्ञानसंपदा बनू शकते. जितके जास्त वाचाल, तितके अधिक जाणून घ्याल आणि तितके जास्त शिकाल. आपोआपच आपल्या ज्ञानात शुद्ध शब्दांची प्रगल्भ ज्ञानसंपदा निर्माण होईल. तुम्ही प्रगती कराल व वेगवेगळी आणि मोठी स्वप्ने पाहाल. ती स्वप्ने अथक परिश्रमाने व वाचनात सातत्य राखल्यामुळे सत्यात उतरतील.

    वाचनाच्या सवयीत सातत्य ठेवले, तर समोरील व्यक्तीवर तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल व योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेत वाढ होण्यास मदत होईल. स्वतःचा प्रभाव निर्माण होईल व आपोआपच आनंदी वातावरण निर्माण होईल. बौद्धिक नम्रतेमुळे आपले नाते सुंदर, प्रगल्भ आणि सकारात्मक बनते. वाचनाने सकारात्मक संकल्प ठेवून दृष्टिकोन व्यापक ठेवता येतो. पुस्तके वाचूनच निसर्ग आणि संस्कृतीचे महत्त्व तरुण पिढीला वेळेतच समजते व संस्कारांतूनच तरुण पिढी घडत असते.

    वाचनाच्या सवयीमुळे जागरूकता वाढते व संवादाचे कौशल्य सुधारते. संवादामध्ये संयम आणि संस्कार या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्याचप्रमाणे वाचनकला शिकणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. वाचनाचा मूलभूत उद्देश ज्ञानप्राप्ती हा आहे. वाचनात सातत्य ठेवल्याने जग समजून घेता येते. वाचनातील विषय वेगवेगळे असले, तरी जीवन एकच आहे. म्हणून वाचनाने विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या भिंतींच्या आत अडकण्याऐवजी त्या भिंतींमधील दरवाजे उघडायला मदत होत असते.

    उदाहरणार्थ, हत्तीचा एखादा भाग पाहून हत्ती म्हणजे एवढेच असे न मानता, विविध विषयांवरील वाचन, विविध अनुभव आणि ज्ञान एकत्र करून संपूर्ण हत्ती समजून घेण्याची दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत असते. याच अर्थाने वाचन म्हणजे केवळ विषयांचे मिश्रण नव्हे, तर विषयांच्या पलीकडे जाऊन ज्ञानाकडे समग्रतेने पाहण्याची दृष्टी मिळवणे होय.

    खऱ्या अर्थाने वाचन हे विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडविते. तसेच वाचनामुळे विविध विषयांतील मूलभूत ज्ञानदेखील स्पष्ट होते. वाचनामुळे विचारक्षमता कशी समृद्ध झाली, हे जाणून घेणारी मूल्यमापन प्रणाली महत्त्वाची ठरते व वाचनाची ओढ निर्माण होते. वाचनाची ओढ लागल्यामुळे माणूस कधीच एकटा नसतो. तो समृद्ध विचारांचे गाठोडे कायम सोबत मिरवत असतो. त्यामुळे वर्तमानात जगणे सोपे व सुलभ होते; कारण वर्तमानात जगण्याची कला आत्मसात करणे हे आजच्या जगात खूप महत्त्वाचे बनले आहे.

    वाचनातून येणाऱ्या विचारांवर प्रश्न करणे ही बुद्धिमत्ताच ठरते. वाचनाची खरी सुरुवात आपल्या विश्वासावर प्रश्न करण्याच्या धाडसाने होत असते. स्वतःची चूक ओळखल्याने जास्त समंजसपणा येतो. वाचनाने मोठी स्वप्ने आणि स्पष्ट ध्येय दिसते व माणूस कधीही हार मानत नाही. वाचनात सातत्य राहिल्याने ज्ञान दीर्घकाळ लक्षात ठेवण्याचा आणि ज्ञानात भर पडण्याचा एक प्रभावी मार्ग मिळतो.

    यामुळे कर्तृत्व, कर्तृत्वातून विश्वास आणि विश्वासातून नेतृत्वाचा इतिहास घडविणारे ऊर्जावान नेतृत्व तयार होताना समाजात स्पष्ट दिसत असते. वाचन ही एक कला आहे. तसेच चौफेर वाचनातून माणूस समृद्ध होतो. ज्ञानकक्षा विस्तारून विचारांचे क्षितिज व्यापक होते. संकटांवर मात कशी करायची, हे वाचनातून आपल्याला कळते. वाचनाचे अचूक नियोजन करून जेवढे जास्त वाचन कराल, तेवढाच जास्त फायदा होतो. तसेच डिजिटल प्रणालीचा वापर केला, तर वेळेची बचत होईल.

    वाचनामुळे आपल्याला आपल्या जगाचा, आपल्या इतिहासाचा आणि स्वतःचा शोध लागतो. कित्येकदा वाचनामुळे माणसाचे नशीब उजळलेले आहे. म्हणून एका चांगल्या बँकेपेक्षाही अधिक संपत्ती पुस्तकात असते.

     

    दिनेश रामचंद्र सावदेकर
    सहाय्यक ग्रंथपाल
    के.सी.ई. सोसायटीचे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय, जळगाव

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण

    November 8, 2026

    दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!

    November 6, 2026

    होमिओपॅथी की मॉडर्न मेडिसिन? भाग २

    October 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif