RBI चा तीन बँकांना दणका; ३० लाखांवर दंड

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेने तीन बँकांना तीस लाख रुपयांहून अधिक दंड ठोठावला आहे. एमयूएफजी बँक, चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लिमिटेड अशी बँकेची नावे आहेत.

कर्जाच्या प्रकरणांमध्ये वैधानिक आणि इतर निर्बंधांबाबतच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे एमयूएफजी बँकेला ३० लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. एमयूएफजी बँक पूर्वी द बँक ऑफ टोकियो-मित्सुबिशी यूएफजे लिमिटेड या नावाने ओळखली जायची. आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, एमयूएफजी बँकेच्या ३१ मार्च २०१९ च्या आर्थिक स्थितीसंदर्भात पर्यवेक्षी मूल्यांकनादरम्यान इतर गोष्टींसह बँकेकडून कंपन्यांचे कर्ज आणि आगाऊ मंजुरी दिल्याप्रकरणात निर्देशांचे पालन न केल्याची माहिती मिळाली. त्याअंतर्गत बँकेने अशा कंपन्यांना कर्ज दिले ज्यांच्या संचालक मंडळात इतर बँकांच्या संचालकीय मंडळातील संचालक होते.

आरबीआय म्हणाले, की रत्नागिरी येथील चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने काही प्रकरणांमध्ये कर्जाच्या मर्यादेचे पालन न केल्याने दोन लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. तसेच मुंबई येथील दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लिमिटेडला अशात प्रकारच्या प्रकरणामध्ये एक लाखाचा दंड करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.