जी. एच. रायसोनी महाविद्यालयात विद्यार्थिनींना ‘स्वसंरक्षणाचे धडे’

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

समाजकंटक, रोडरोमियोंचा मुकाबला करण्यासाठी त्याचबरोबर स्‍वरक्षणासाठी जिल्हा पोलीस दलाच्या निर्भया पथकातील एपीआय मंजुळा तिवारी यांनी जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात “जागतिक महिला दिन’ अंतर्गत सुरु असलेल्या महिला सन्मान सप्ताहात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले.

यात स्वरक्षण करण्यासाठी लाठीचा वापर, ऐनप्रसंगी घ्यावयाची दक्षता, अडचणींच्या प्रसंगात स्वतःचा बचाव करता यावा, यासाठी मुलींना स्व-सरंक्षण व त्यांचे तंत्रे यासंदर्भात त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयात महिला दिनानिमित्त संपूर्ण सप्ताहात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी या उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना नमूद केले कि, लग्नानंतर दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणून अगदी लहानपणापासून मुलींना स्वयंपाकाचे, शिवणकलेचे, व्यावहारिकतेचे धडे दिले जातात. या सगळ्या धडय़ांना छेद देत आज स्त्रियांबरोबर ज्या घटना देशभरात घडत आहेत ते पाहता त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देणे जास्त गरजेचे आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात महिला पोलीस मंजुळा तिवारी म्हटल्या कि, कोणी तुमची छेड काढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर तुटुन पडा आणि त्याला अद्दल घडवत खेचत पोलीस ठाण्यात आणण्याची धमक ठेवा,

आजच्या तरुणींना मर्दानी प्रमाणे धडाकेबाज होण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच जळगावमधे निर्भया सेल ची स्थापना करण्यात आली असुन या माध्यमातून शहरातील महिला आणि तरुणींसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याचा प्रयत्न जळगाव पोलीस करणार असल्याचं मंजुळा तिवारी यांनी सांगितलं. यानंतर या कार्यक्रमात सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील व पोलीस कोस्टेबल अरविंद वानखेडे यांनी “सायबर सुरक्षितता आणि जागरूकता” याविषयावर सखोल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी प्रा. श्रेया कोगटा, प्रा. ज्योती जाखेटे व प्रा. प्रिया टेकवानी यांनी सहकार्य केले तसेच सूत्रसंचालन संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील यांनी तर आभार बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.