Saturday, December 3, 2022

बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार पूर्ववत

- Advertisement -

चिखली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार पूर्ववत करण्याच्या रयत क्रांती संघटनेच्या मागणीला यश आले.  शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेणारे महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या शापाला बळी पडले असल्याचे रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत हे कृषी, पणन, पाणीपुरवठा व फलोत्पादन राज्यमंत्री असतांना त्यांनी फडणवीस सरकारच्या काळात बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतलेला होता.  दरम्यान सत्ता पालट झाल्यानंतर शेतकरी विरोधी भूमिका असलेल्या महाविकास आघाडीने हा निर्णय रद्द केला होता.

सरकारच्या बदलानंतर रयत क्रांती संघटनेच्या वतीने परत एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार पूर्ववत करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. या निवेदनातील मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत बाजार समितीत शेतकऱ्यांना मताचा अधिकार पूर्ववत करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेल्या मागणीला यश आले असून शेतकऱ्यांचे अधिकार हिरावून घेतलेले महाविकास आघाडी  सरकार शेतकऱ्यांच्या शापाला बळी पडले असून शिंदे, फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मताचा अधिकार पूर्ववत केल्या बद्दल रयत क्रांती पक्षाच्या वतीने नवीन सरकारचे अभिनंदन राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या