Tuesday, May 24, 2022

अभिनेत्री रवीनाला पितृशोक, रवी टंडन यांचे निधन

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

बॉलीवूडला धक्का देणारी एक बातमी आता समोर आली आहे. ती म्हणजे प्रसिद्ध निर्माते रवी टंडन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री रवीना टंडन हिचे ते वडील होते. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडीयावरुन व्हायरल झाली आहे. रवी टंडन यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत मजबूर आणि खुद्दार सिनेमांची निर्मिती केली होती. त्यांच्या जाण्यानं बॉलीवूडमधील दिग्गज व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे.

रवीनानं ही बातमी सोशल मीडियावरुन व्हायरल केली आहे. यावेळी तिनं काही फोटोही आणि वडिलांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिनं लिहिलं आहे की, तुम्ही नेहमीच माझ्यासोबत राहाल. तुम्ही सांगितलेल्या वाटेवरुन आतापर्यत वाटचाल केली आहे. यापुढे देखील ती करत राहिल. तुमचे विचार नेहमीच मला प्रेरणा देत राहतील. यावेळी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी रवी टंडन यांना आदरांजली वाहिली आहे.

बॉलीवूडमधील अभिनेते चंकी पांडे, अभिनेत्री नीलम यांनी यावेळी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करुन रवी टंडन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रवी यांच्या जाण्यानं बॉलीवूडचे मोठे नुकसान झाले आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या