अजंदे शिवारात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सोशल मीडियावर ठेवला स्टेटस; पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
रावेर प्रतिनिधी : तालुक्यातील अजंदे शिवारात एका २१ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून केली आहे.
मृत तरुणाचे नाव अफजल रमा तडवी (वय २१, रा. विवरे बुद्रुक, ता. रावेर) असे आहे. माहितीप्रमाणे, अफजल २९ सप्टेंबर रोजी पत्नी सानियासह भोकरी येथे सासरी गेला होता. दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी दुपारी त्याने सोशल मीडियावर “आज मी आत्महत्या करीत आहे आणि त्यास मी स्वतः जबाबदार आहे” असे स्टेटस टाकले.
यानंतर अजंदे रस्त्यालगत असलेल्या केळीच्या बागेत रामफळाच्या झाडाच्या फांदीला गळफास घेऊन त्याने जीवन संपवले. ही घटना दुपारी साधारण साडेचारच्या सुमारास उघडकीस आली.
प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

