Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»बोरघाटात क्लूझरचा भीषण अपघात ; १ ठार,११ जखमी
    अपघात

    बोरघाटात क्लूझरचा भीषण अपघात ; १ ठार,११ जखमी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 11, 2025Updated:October 11, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोरघाटात क्लूझरचा भीषण अपघात ; १ ठार,११ जखमी

    पाल ता. रावेर – पाल–खिरोदा दरम्यान असलेल्या बोरघाटात दि. १० ऑक्टोबर सकाळी सुमारास १० वाजता क्लूझर (क्र. MH19 CF 3920) वाहनाचा भीषण अपघात झाला. भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडे येथील नागरिक पालकडे येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या घटनेत एकाचा मृत्यू तर ११ प्रवासी जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बोरघाटातील वळणावर क्लूझरचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला घसरले आणि झाडांना धडकून उलटले. मार्गावरील जाणाऱ्या नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना बाहेर काढले. जखमींना प्राथमिक उपचारासाठी पाल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

    जखमींची नावे – पद्माकर पाटील (वय ६२), गणेश चौधरी (वय ६४), गोपाळ कोळी (वय ७१) आणि चालक प्रशांत चौधरी (वय ४८) अशी आहेत. मृत व्यक्तीचे नाव विजय राणे (वय ५५, रा. अंजनसोंडे) असे असून, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    accident Raver
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif