Tuesday, May 24, 2022

प्रेमी युगुलाची झाडाला गळफास घेत आत्महत्या

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

तालुक्यातील विश्राम जिन्सी येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत.

- Advertisement -

रावेर तालुक्यात विश्राम जिन्सी येथे एका प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे युवक आणि युवती अविवाहीत असुन गावापासुन जवळच काही अंतरावर असलेल्या शेतातील झाडाला दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले आहेत. मुकेश गोकुळ पवार (वय २३) व गायत्री परशुराम पवार (वय १८ ) अशी दोघांची नावे आहे.

प्रेम प्रकरणातुन या दोघांनी आत्महत्या केली असावी, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. रावेर पोलिस निरिक्षक कैलास नागरे, पोलिस उप निरीक्षक विशाल सोनवणे आदी सहका-यांसह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या