
रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
रावेर येथे दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था होळ यांच्या पुढाकाराने 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी अध्यक्षीय भाषणात आमदार अमोल जावळे यांनी सांगितले की, रावेर येथे लवकरच दिव्यांग भवन उभारण्यात येणार असून, रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग बांधवांचे प्रमाणपत्र तपासणी शिबिर दर महिन्याला नियमित होणार असून, सदैव कायमस्वरूपी तपासणी सुरू राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
रावेर येथील श्री दत्तगुरु छाया मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास आमदार अमोल जावळे यांच्यासह माझी जीप उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, परिविक्षा दिन उपजिल्हाधिकारी दीपा जेधे, नगराध्यक्ष संगीता महाजन, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, हरीश गनवाणी, उद्योजक श्रीराम पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी खेमचंद वानखेडे, ज्ञानेश्वर महाजन, सातपुडा विकास मंडळाचे धंनजय चौधरी, शिव सेना शिंदे गटाचे वाय व्ही पाटील, राहुल पाटील, राकाचे सोपान पाटील, माजी सदस्य योगिता वानखेडे, पिके महाजन, संदीप सावळे, नगरसेवक राजेश शिंदे, अमोल पाटील, कांतीलाल महाराज आदी प्रमुख उपस्थित होते.
सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक एडवोकेट रमाकांत महाजन यांनी केले, तर विवाहाचे पौराहित्य प्रदीप वैद्य, अभय जोशी आणि दुबे यांनी पार पाडले. या कार्यक्रमात डॉक्टर संदीप पाटील आणि डॉक्टर योगिता पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला. तहसीलदार श्रीमती जेधे यांनी दिव्यांग बांधवांच्या कल्याणकारी योजनांसह नुकतीच सुरू असलेली जनगणना कार्यक्रमात प्रत्येकाने शासनाकडून आलेल्या प्रगणकास योग्य माहिती द्यावी आणि आपली नोंदणी करून घ्यावी, सशक्त राष्ट्रासाठी प्रत्येकाने नोंदणी करणे आवश्यक आहे, असे आवाहन केले.
नंदकिशोर महाजन यांनी सांगितले की, शासनाच्या विविध योजनांचा लाभ आपण घेऊ, आणि त्यानंतर विविध मान्यवरांचे मनोगत होऊन अध्यक्षीय भाषण आमदार अमोल जावळे यांनी केले. यात दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक मदतीसाठी सदैव तयार राहू आणि त्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी कृऊबा सभापती प्रल्हाद पंडित पाटील, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, जे. के. पाटील सर, डॉ. एस. आर. पाटील, मुकुंद गोसावी, अरुण शिंदे, देवेंद्र मिसर, सोपान पाटील, ऍड. आर. के. पाटील, मुबारक तडवी, जी. टी. महाजन, नोडल अधिकारी जयश्री चौधरी, भागवत विश्वनाथ पाटील, रमेश नामदेव महाजन, दिलीप पाटील, दुर्गादास पाटील, सी. एस. पाटील, दीपक कुळकर्णी, दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रमुख शंकर गणेशकर, डी. डी. आर. सी. चे नोडल अधिकारी जी. टी. महाजन, मुक्ती फौंडेशन अध्यक्ष मुकुंद गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात चाळीसगाव येथून वाल्मिक सातव यांनी आपल्या सुरेख आवाजात गीते सादर केली. सूत्रसंचलन दीपक नगरे यांनी केले तर आभार मुबारक तडवी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रावेर संस्थेचे संजय बुआ (सचिव), घनश्याम हरणकर (खजिनदार), रजनीकांत बारी (सहसचिव), संदीप पाटील, सभासद दिलीप जैन, कैलास महाजन, पुंडलिक धनगर, ज्योती बारी, योगेश महाजन, संजू माळी, पवन शिरनामे, विजय बारी, निलेश पाटील, विनोद चव्हाण, रमेश चौधरी, प्रदीप परदेशी, सामाजिक कार्यकर्ते महेश गजेश्वर, नारायण लोणारी, मनोज महाजन, गजानन बारी, योगेश महाजन, अशोक महाजन यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

