Friday, August 12, 2022

स्कूलबसची ॲपेरिक्षाला जोरदार धडक; बालिका ठार, एक जण जखमी

- Advertisement -

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

स्कूलबस व ॲपेरिक्षा यांच्या धडकेत रिक्षातील तीन वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना खानापुर-बुरहानपुर- अंकलेश्वर महामार्गावर घडली.

- Advertisement -

- Advertisement -

मध्यप्रदेशातील पातोंडा येथे पत्नीच्या भेटीसाठी सारसवाडीला गेलेले सायबु बाबु तडवी (वय ३०, रा. आभोडा ता. रावेर) हे आपल्या तीन वर्षाची मुलगी महेक सायबु तडवी या चिमुकलीसह ॲपे रिक्षाने रावेरच्या दिशेने येत होते. त्यावेळी बऱ्हाणपुरकडे जाणाऱ्या स्कूल बसने ॲपेरिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत तीन वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली आहे तर सायबु तडवी हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात खानापूर जवळील नवीन चेक पोस्ट जवळ घडला आहे. जखमीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.

स्कूल बस व रिक्षाच्या अपघाताची माहीती मिळताच राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, पंचायत समिती सदस्य पी.के. महाजन यांच्यासह नागरीकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेत एकच गर्दी केली होती.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या