भीषण अपघात.. बाप अन् चिमुकल्या लेकाचा करुण अंत

थारची दुचाकीला जोरदार धडक , रावेरच्या बोर घाटातील घटना

0

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रावेर तालुक्यातील बोर घाटात भीषण अपघात झाला आहे.  थार जीप आणि मोटरसायकलमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील बाप आणि लेकाचा  जागीच मृत्यू झाला. पिंटू बोडोले (वय ३५) आणि त्यांचा ४ वर्षांचा चिमुकला रितिका पिंटू बोडोले (रा. पाल, ता. रावेर) यांचा या अपघातात करुण अंत झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंटू बोडोले हे पत्नी मालुबाई (वय 28) आणि दोन मुले -ऋतिक (वय ४) व आठ महिन्यांचा टेंगुराम यांच्यासह भुसावळहून पाल येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. रविवार (दि.27) रोजी रात्रीच्या सुमारास बोर घाटात, खेरगावकडून भुसावळकडे भरधाव वेगाने येणाऱ्या थार जीपने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की पिंटू आणि त्यांच्या चिमुकल्या ऋतिकचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे रावेरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.  बोडोले कुटुंब भुसावळ येथे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. गरीब आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या आदिवासी कुटुंबावर अचानक मोठे संकट कोसळले आहे. अपघाताची माहिती मिळताच भाजप रावेर पूर्व तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील व बाळा आमोदकर यांनी तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. जखमी मालुबाई बोडोले आणि आठ महिन्यांचा टेंगुराम यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी फैजपूर येथे हलवले आहे. त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान, पोलिसांनी संबंधित थार जीप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.