रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात तापमानाचा पारा वाढला असला तरी काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रावेर शहरात आज दुपारी चार वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला होता.
तर काही सेकंद बोराएवढी गार पडली. हा पाऊस थोडा वेळ झाला .त्यामुळे शहरातील विज पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. उकाड्याने हैराण झालेल्या रावेर वासियांना पाऊसामुळे थोडा गारवा जाणवत आहे. मात्र अजूनही पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.