Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»रवीना टंडनच्या आईच्या विश्वासाचा गैरफायदा
    गुन्हे वार्ता

    रवीना टंडनच्या आईच्या विश्वासाचा गैरफायदा

    जवळच्या व्यक्तीकडून लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 2, 2026No Comments405 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांच्या कुटुंबीयांच्या घरात झालेल्या चोरीच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. रवीना टंडन यांचे बंधू राजीव टंडन यांच्या जुहू येथील निवासस्थानातून सुमारे २५ लाख रुपये किमतीचे सोन्या-हिऱ्यांचे दागिने आणि महागडी घड्याळे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राशी छब्रिया (वय ४७) या महिलेला अटक केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, राशी छब्रिया ही गेल्या काही वर्षांपासून रवीना टंडन यांच्या आई वीणा टंडन यांची देखभाल करण्यासाठी काम करत होती. त्यामुळे तिचा घरात मुक्त वावर होता. ऑगस्ट २०२५ मध्ये घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अनेक मौल्यवान वस्तू अन्यत्र हलविण्यात आल्या होत्या. मात्र वीणा टंडन यांचे सोन्या-हिऱ्यांचे दागिने घरातील तिजोरीत सुरक्षित ठेवण्यात आले होते.

    २ ऑक्टोबर २०२५ रोजी दसरा सणानिमित्त कुटुंबीयांनी तिजोरीची पाहणी केली असता ती फोडलेली आढळून आली. तसेच तिजोरीतील सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने आणि राजीव टंडन यांची दोन महागडी मनगटी घड्याळे चोरीला गेल्याचे समोर आले.

    पोलिसांच्या तपासात राशी छब्रिया हिच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. सुरुवातीला तिने चोरीबाबत अनभिज्ञता दर्शविली. मात्र कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिने तिजोरी फोडून दागिने आणि घड्याळे घेतल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तिने दोन घड्याळे परत केली असली तरी दागिने मात्र अद्याप मिळालेले नाहीत.

    चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या बांगड्या, हार, अंगठ्या, कानातले, ब्रेसलेट्स, हिरे जडवलेले मंगळसूत्र तसेच अन्य मौल्यवान दागिन्यांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत सुमारे २५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. राजीव टंडन यांनी दिलेल्या तक्रारीवरून जुहू पोलिसांनी १९ मे रोजी गुन्हा दाखल केला. त्यानंतर २१ मे रोजी राशी छब्रिया हिला अटक करण्यात आली. न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली होती. सध्या चोरीस गेलेल्या दागिन्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ओमानच्या समुद्रात तेलवाहू जहाजावर मोठा हल्ला

    June 9, 2026

    अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडले

    June 9, 2026

    भुसावळ घरफोडीचा 12 तासांत छडा!

    June 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif