Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»श्रीराम वहनोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ; २ नोव्हेंबरला रथोत्सव
    ताज्या बातम्या

    श्रीराम वहनोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ; २ नोव्हेंबरला रथोत्सव

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 20, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    श्रीराम वहनोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ; २ नोव्हेंबरला रथोत्सव

    जळगाव प्रतिनिधी

    जळगावमधील ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या श्रीराम रथवहनोत्सवाला बुधवार, दि. २२ ऑक्टोबर पासून प्रारंभ होत आहे. हा अकरा दिवसांचा उत्सव असून, शहरातील विविध भागातून घोडा (अश्व), हत्ती (ऐरावत), वाघ, सिंह, सरस्वती, चंद्र, सूर्यनारायण, गरुडराज, मारुती आणि रासक्रीडा अशा एकूण १० वहनांची यात्रा निघेल. वहन मार्गावर पानसुपारीचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.

    उत्सवाच्या दिवशी श्रीराम मंदिरात दररोज पहाटे काकड आरती, पूजा-अभिषेक, सातला मंगल आरती, काकड भजन पार पडतील. दुपारी ४ ते ५ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ होईल, त्यानंतर संध्याकाळी भजन, संध्यापूजा आणि आरती होईल. संध्याकाळी सात वाजता श्रीराम मंदिरातून वहन व दिंडी निघेल.

    वहनांची वेळापत्रक:

    बुधवार, २२ ऑक्टोबर: घोडा (अश्व)

    गुरुवार, २३: हत्ती (ऐरावत)

    शुक्रवार, २४: वाघ

    शनिवार, २५: सिंह

    रविवार, २६: सरस्वती

    सोमवार, २७: शेषनाग

    मंगळवार, २८: गजेंद्रमोक्ष

    बुधवार, २९: चंद्र

    गुरुवार, ३०: सूर्यनारायण

    शुक्रवार, ३१: गरुडराज

    शनिवार, १ नोव्हेंबर: मारुतीराय

    रविवार, २ नोव्हेंबर: मुख्य श्रीराम रथयात्रा

    वहनावर श्रीरामाची उत्सवमूर्ती:
    प्रत्येक वहनावर श्रीक्षेत्र अयोध्येतील रामानुज संप्रदायाचे स्वामी रामानंद यांच्याकडून मिळालेली श्रीरामाची प्रासादिक उत्सवमूर्ती असते. सोबत संत मुक्ताबाई, स्वामी नरसिंह सरस्वती महाराज (आळंदी) आणि कुंवरस्वामी महाराज (वाघोड) यांच्या पादुका देखील ठेवण्यात आल्या आहेत.

    हा उत्सव जळगाववासीयांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा असून, वहनोत्सवाचा आनंद दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    jalgaon Shriram Rathotsav jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026

    वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif