बालपणीच जुळले मराठीशी ‘रश्मीका मंदानाचे’ नाते

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठी लावणीवर ठुमके लगावताना रश्मिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. झी मराठी वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात रश्मिकानं लावणीवर धडाकेबाज डान्स केला आहे. त्याची छोटी झलक साऱ्यांनी पाहताच समस्त मराठीजनांचे मन जिंकून गेली. नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आता केवळ साऊथमध्येच नाही तर बॉलीवूडमध्येही भलतीच सक्रिय झालीय असं म्हणत असताना पठ्ठीनं मराठी इंडस्ट्रीचा (Marathi Industry) मंचही गाजवल्याचं नुकतंच समोर आलं आहे.

कार्यक्रमातला रश्मिकाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात तिनं लहानपणीच आपले मराठीशी सुर जुळले होते याविषयीचा एक किस्सा सांगितला आहे. झी मराठीच्या मंचावर बोलताना रश्मिका म्हणाली,”मराठीशी माझे सूर लहानपणीच जुळले”. आपल्या बालपणीची आठवण सांगत ती म्हणाली, ”लहानपणी मी ऐका दाजिबा गाण्यावर डान्स केला होता..त्यामुळं तेव्हाच मराठी भाषेशी माझं कलेच्या माध्यमातून कनेक्शन पहिल्यांदा जुळलं आहे. त्यानंतर इतक्या वर्षांनी मी आता लावणी करत आहे तेव्हा मला खूप मस्त वाटतंय”.

Leave A Reply

Your email address will not be published.