२२ मुलांच्या आईला १०० मुलांची आई बनायचे आहे स्वप्न !

0

मॉस्को ;-भारतासह जागातील वेगाने वाढणारी प्रचंड लोकसंख्या एकीकडे वाढत असताना काही देशांमध्ये हं दो हमारे दो , किंवा हमारा एक अशी संकल्पना राबवत असताना एका रशियन महिला मात्र या गोष्टीला अपवाद ठरत आहे. तिने एक किंवा दोन नव्हे तर तब्बल 22 मुलांना जन्म दिला. ही महिला केवळ 26 वर्षांची आहे.

26 वर्षीय रशियन महिला क्रिस्टीना ओझटर्क जॉर्जियामध्ये राहते. तिला 22 मुलं आहेत पण तिला हा आकडा 3 अंकांवर म्हणजेच 100 वर न्यायचा आहे.मुलांना जन्म देण्याच्या बाबतीत तिला शतक करायचं आहे. 26 वर्षीय महिलेला 22 मुलं कशी होऊ शकतात हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. पण तिला 100 मुलांना जन्म द्यायचाय हे ऐकून अनेकांना धक्काच बसला आहे.

मोठी 8 वर्षांची मुलगी व्हिक्टोरियावेळी क्रिस्टीनाला नैसर्गिकरित्या गर्भधारणा झाली होती. मात्र त्यानंतरची सर्व 21 मुले सरोगसीद्वारे जन्माला आली. या 21 पैकी 20 मुलांचा जन्म 2020 मध्ये झाला होता. ती त्या सर्वांवर खूप प्रेम करते.

Leave A Reply

Your email address will not be published.