धक्कादायक.. बालिकेवर 6 महिने बलात्कार, 54 जणांना घेतले ताब्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क

आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे नुकताच एक संपातजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे तिथल्या परिसारातील पालकांच्या मनामध्ये मोठी भिती निर्माण झाली आहे. कारणही तसंच मागच्या सहा महिन्यापुर्वी मजुराच्या एका बालिकेला कोरोना झाला होता. त्याने तिला एका रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यानंतर तिथल्या एका नर्सने उपचाराच्या नावाखाली त्या बालिकेला घरी नेलं. घरी घेऊन गेल्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले.

बालिका बरी झाल्याची लक्षात आल्यानंतर त्या नर्सने तिला बळजबरीने देह विक्रय करण्यास भाग पाडले. तसेच मागच्या झालेल्या काळात त्या मुलीला अनेक सेक्स रॅकेटमध्ये ठेवण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी नर्स स्वर्णकुमारीला अटक केली असून आत्तापर्यंत तिने किती मुलींना फसवलं आहे याचा पोलिस तपास करीत आहेत.

54 जणांना अटक

पोलिसांनी कारवाई केल्याने 54 जण ताब्यात घेतले आहेत. त्यापैकी सगळ्यांनी बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर बालिका ही आठवीत शिक्षण घेत होती. ती एका मजुराची मुलगी आहे. मुलीला कोरोना झाल्यानंतर तिच्या वडिलांनी जवळच्या सामान्य रूग्णालयात तिला दाखल केलं होतं. त्यावेळी तिथल्या नर्सने दया दाखवत मी घरी नेऊन उपचार करतो असं मुलीच्या वडिलांना सांगितलं होतं. त्यानंतर वडिलांना तिच्यावर विश्वास वाटल्याने वडिलांनी मुलीला ताब्यात दिलं.

कथित नर्स असल्याचं उघड

कथित नर्सने मुलीला हैदराबाद, विजयवाडा, नेल्लोर अशा अनेक ठिकाणी नेलं. तिथ नेल्यानंतर त्या चिमुरडीवर पुरूषांनी बलात्कार केला. दरम्यानच्या काळात मुलीच्या आईवडिलांना मुलगी सुखरूप असल्याचे कथित नर्सने सांगितले होते. सगळा प्रकार खरा वाटावा म्हणून कथित नर्स मुलीचं बोलणं वडिलांसोबत समोर असताना फोनवरती करून देत असतं. तिथून पळ काढण्यात अखेर मुलीला यश आलं, तिथून ती गायब झाल्याचं नर्सने तिच्या वडिलांना सांगितलं. त्यानंतर तिच्या वडिलांनी जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुलीचं दुर्देव

पळून गेल्यानंतर एका बसथांब्यावर थांबलेल्या मुलीला वेश्याव्यवसाय करणा-या एका महिलेने ओळखले. तसेच तिच्याशी गोड बोलून तिने कशीबशी तिला घरी नेली. त्यानंतर ओळख झालेल्या महिलेने देखील तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. हा प्रकार उघकीस आल्यानंतर पोलिसांनी आत्तापर्यंत 54 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच नर्स आणि इतर महिलांची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here