Wednesday, September 28, 2022

धमकी देत २४ वर्षीय महिलेवर अत्याचार; ८ जणांवर गुन्हा दाखल

- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

पाचोरा येथून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. मुलाला मारण्याची धमकी देत तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच महिलेला शिवीगाळ करुन माराहाण करत पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अनिल देविदास काळे, संदीप जाधव या दोघांना अटक करण्यात आले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

बकरीचा चारा घेण्यासाठी सदर २४ वर्षीय महिला गेली असता नितीन एकनाथ जाधव याने पिडीत महिलेस तिच्या ‘मुलाला मारण्याची धमकी देत जबरदस्ती अत्याचार केला. या घटनेबाबत पिडीत महिलेने आपल्या पतीस सांगितले. याबाबत पिडीत महिलेच्या पतीने नितीन जाधव यास विचारणा केली असता त्याने त्याला देखील शिवीगाळ केली.

दरम्यान दि.१९ एप्रिल रोजीच्या संध्याकाळी ६.०० वाजेच्या सुमारास आनिल काळे, संदीप जाधव आणि एका महिलेने पिडीतेच्या घरात घुसून शिवीगाळ करुन माराहाण केली. तसेच पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर पीडित महिलेशी गैरवर्तन केले. यावेळी नितीनच्या नातेवाईकांनी महिलेला शिवीगाळ केली.

अनिल देविदास कोळी यांच्या सांगण्यावरुन नितीन जाधवच्या पत्नीने पिडीतेच्या पती व नातेवाईक विरुद्ध खोटी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात नितीन जाधव, संदीप जाधव, नितीनचा पाहुणा भरत, नितीनची नातेवाईक तीन महिला आणि आनिल देविदास काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आनिल देविदास काळे, संदीप जाधव या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे या करीत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या