mc central redeem coupons pixel art gift buy an engagement gift for a boyfriend gift card itunes kaskus tk maxx gift cards
Thursday, December 1, 2022

धक्कादायक.. तरुणीला लग्नाचे आमिष देत तीन वर्षांपासून अत्याचार

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव (Jalgaon) शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर तीन वर्षांपासून अत्याचार (Rape Case) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Crime) करण्यात आला आहे.

- Advertisement -

जळगावातील रुख्मिणी नगरमध्ये ३२ वर्षीय तरुणी ही आपल्या कुटुंबियांसह राहते. शिवकॉलनीत राहणारा निलेश दत्तात्रय सोनजे याने तरूणीला लग्नाचे अमिष दाखवत १२ मे २०१९ ते १३ सप्टेंबर २०२२ दरम्यान वेळोवळी तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा अत्याचार सहन न झाल्याने तरूणीने संबंध ठेवण्यास नकार दिला. याचा रागातून निलेश सोनजे याने तरूणीला मारहाण करून तिला व तिच्या परिवाराला जीवेठार मारण्याची धमकी दिली.

- Advertisement -

तरूणीने याप्रकरणी मंगळवारी ११ ऑक्टोबर रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून संशयित आरोपी निलेश दत्तात्रय सोनजे रा. शिवकॉलनी जळगाव याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तास सपोनि रोहिदास गभाले करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या