स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला मरे पर्यंत जन्मठेप…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

स्वतःच्या मुलीवर बलात्कार करून गर्भवती करणाऱ्या नराधम बापास कोर्टाने दोन वेळा मरेपर्यंत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पारोळा पोलिस स्टेशन हद्दीतील कन्हेरे या गावातील रवींद्र शामराव पाटील वय ३९ वर्ष यांनी त्यांचे वडील सण २०२० मध्ये मरण पावले, त्यांच्या पत्नीला इतर नातेवाईकांकडे बाहेर काढणे या रूढी प्रमाणे बाहेर गेली असता, मुलगी (१६) ही घरीच होती. याचा गैरफायदा घेत स्वतः वडिलांनी मुलीवर जबरदस्ती केली, आणि ती त्यामुळे सहा महिन्यांची गर्भवती राहिली.

पीडित मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमूद गुन्ह्याचा शास्त्रीय पुरावा गोळा करून पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांनी आरोपपत्र मा न्यायालयात सादर करण्यात आले होते, नमूद केस ही अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश क्र. १ एस बी गायधनी यांच्या कोर्टात चालली. यादरम्यान एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले, किशोर आर बागुल यांनी कामकाज पाहिले. तसेच पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून उदयसिंग साळुंखे यांनी सहकार्य केले. न्या. एस बी गायधनी अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी रवींद्र शामराव पाटील यास बलात्कार व पोक्सो कायद्यांन्वये कलम ६ प्रमाने जन्मठेपेची आजीवन कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा रासेच कलम ५०६ भा द वि प्रमाणे सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व एक हजार रुपये दंड,दंड न भरल्यास एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.