अत्याचार करून तरूणीचा गर्भपात; आरोपीस अटक

0

दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील मोहराळा गावातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवुन वारंवार शारीरिक संबंध (Rape Case) ठेवुन अत्याचार करून गर्भपात (Abortion) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिडित तरूणीच्या फिर्यादी वरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातीत मोहराळा गावात एक २२ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. याच मोहराळा गावात राहणारा निलेश पंढरीनाथ पाटील याची पिडीत तरूणीशी २०२१ मध्ये ओळख निर्माण झाली व या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले. दरम्यान निलेश पाटील याने पिडीत २२ वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या आजीच्या घरात आणि त्याच्या खळयात जुन २०२२ पर्यंत वेळीवेळी तरूणीची ईच्छा नसतांना शारीरिक संबंध ठेवून तिचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दरम्यान या सर्व प्रकारानंतर पिडित तरुणीने आपल्या नातेवाईकांसह यावल पोलीस ठाण्यात धाव घेत तरूणाविरुध्द तक्रार दिली असुन सिसिटीएनएस ४५४ / २०२२ भादवी कलम ३७६ (२) (एन) ३१३. ३१५, ३१६ सहअनुसुचित जाती जमाती कायदा कलम १९८९ चे कलम ३ (१) अशा विविध कलमाअंतर्गत गुन्ह्यातीत संशयीत आरोपी निलेश पाटील यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास फैजपुर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.