छ. संभाजीनगर, लोकशाही न्युज नेटवर्क
भाजपचे ज्येष्ठ नेते तथ माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मुलीबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
कन्नडच्या माजी जिल्हा परिषद सदस्य संजना जाधव ह्या कन्नड-सोयगाव मतदारसंघातील नियोजित दौऱ्यावर निघाल्या होत्या. त्यांची गाडी धुळे-सोलापूर हायवेवर असताना एका पिक-अपने त्यांच्या गाडीला धडक दिली.
पिक-अप चाळीसगावमार्गे रांजणगावकडे निघालं होतं. रांजणगाव फाट्यावर संजना जाधव यांच्या गाडीचा व पिक-अप गाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये संजना जाधव आणि गाडीतील सर्वजण सुखरुप आहेत. गाडीच्या एका बाजूला धडक बसली आहे.