Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»मनोरंजन»अभूतपूर्व यश मिळालेल्या रणवीरला काम करण्यावर बंदी!
    मनोरंजन

    अभूतपूर्व यश मिळालेल्या रणवीरला काम करण्यावर बंदी!

    यापुढे काम न करण्याचे आदेश : काय आहे नेमके प्रकरण?
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 26, 2026No Comments532 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    ‘धुरंधर’ चित्रपटाच्या दोनही भागांना मिळालेल्या अभूतकपूर्व यशामुळे अभिनेता रणवीर सिंह हा चांगलाच चर्चेत होता. त्याच्या कामाचे कौतुक तर झालेच, पण चित्रपटाने बॉक्स ऑफीसवरही बक्कळ कमाई केल्याने रणवीरचा भाव बराच वधारला. त्याची लोकप्रियताही प्रचंड वाढली. मात्र आता हाच रणवीर पुन्हा चर्चेत आला तो फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटामुळे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE) रणवीर सिंगविरोधात एक मोठं पाऊल उचललं आहे. FWICE ने त्याच्याविरोधात असहकाराचा अर्थात नॉन-कोऑपरेशनचा आदेश जारी केला आहे. त्याच्यावर बंदी घालण्यात आली असून हा वाद मिटेपर्यंत कोणीही त्याच्यासोबत काम करणार नाही.

    मात्र या वादादरम्यान, रणवीर हा आता पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसला आहे. कालच रणवीर सिंह हा मुंबई विमानतळावर दिसला, मात्र त्याच्याभोवती सुरक्षा व्यवस्था होती. या अभिनेत्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचा लूक पाहून तर अनेकांना धक्का बसलाय.

    अभिनेता रणवीर सिंहवर बंदी घालण्यात आली आहे आणि त्याच्यासोबत यापुढे काम न करण्याचे आदेश एफडब्ल्यूआयसीईने (FWICE) चित्रपटसृष्टीला दिले आहेत. फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ मधून रमवीरने अचानक माघार घेतल्यामुळे अभिनेत्याविरोधात हा निर्णय घेण्यात आला. या सर्व वादादरम्यान काहीही न बोलणारा, मौन बाळगणारा रणवीर काल पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या स्पॉट झाला. त्याचा अंदाचही बराच बदलल्याचं दिसून आलं.

    अचानक एअरपोर्टवर दिसला

    ‘धुरंधर’पासून रणवीर सिंग चर्चेत असून आणि ‘डॉन 3’ मुळे त्याच्याबद्दलची चर्चा आणखीनच वाढली. या वादाच्या पार्श्वभूमीवर रणवीर सिंह काल एअरपोर्टवर दिसला, मात्र त्याच्याभोवती सुरक्षारक्षकांचं कडंही दिसून आलं. साधा पांढरा कुर्ता पायजमा आणि नेहरू जॅकेट घातलेला रणवीर साध्या अंदाजात दिसला. मात्र त्यासोबत काळा गॉगल, आणि काळा मास्क लावल्याने त्याचा चेहरा पूर्णपणे दिसत नव्हता. गाडीतून उतरल्यावर तो थेट चालायला लागला, तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींशी ना तो काही बोलला ना फोटोसाठी पोझ दिली. वादाच्या दरम्यान पहिल्यांदाच स्पॉट झालेल्य रणवीरच्या चेहऱ्यावर हास्य किंवा नेहमीचा खेळकरपणा नव्हता. तो आपल्या गाडीतून उतरून शांतपणे आत निघून गेला.

    दिग्दर्शक फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार होता. चित्रपटाची घोषणाही झाली होती, पण नंतर रणवीरने यातून माघार घेतली. फरहान अख्तरच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनचं काम आधीच सुरू झालं होतं आणि त्यावर अंदाजे 45 कोटी रुपये खर्चही झाला होता. पण रणवीरने चित्रपटातून अचानक माघार घेतल्यामुळे निर्मात्यांचं मोठं नुकसान झालं आहे. फरहानने फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन (IFTDA) कडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पुढील कारवाईसाठी हे प्रकरण FWICE कडे पाठवण्यात आले. आता, FWICE ने रणवीरविरुद्ध नॉन-कोऑपरेशन नोटीस बजावत त्याच्यावर बंदी घातली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कोणत्याही परिस्थिती हा कायदा लागू केला जाणार नाही!

    September 15, 2026

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif