Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    गुन्हे वार्ता

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    गुटखा, पन्नी दारू सट्टा-मटक्याच्या विळख्यात तरुणाई उद्ध्वस्त
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 7, 2026No Comments208 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    यावल तालुक्यात महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा, जीवघेणी पन्नी दारू आणि अवैध सट्टा-मटका खुलेआम सुरू असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे. या तिहेरी व्यसनांच्या विळख्यात तालुक्यातील हजारो तरुण अडकले असून अनेक कुटुंबे आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, या गंभीर प्रकारांकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही केला जात आहे.

    यावल, फैजपूर, किनगाव, हिंगोणा आणि साकळी परिसरातील पानटपऱ्यांवर बंदी असलेला गुटखा, मावा, विमल आणि सुगंधित तंबाखू विकला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातही हा माल विकला जात असल्याचा आरोप आहे. १५ ते १६ वर्षांची मुले गुटख्याच्या आहारी जात असल्याने कर्करोगाचे प्रमाण तालुक्यात झपाट्याने वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

    तालुक्यातील नदीकाठ व शेतशिवारात हातभट्टीची विषारी पन्नी दारू पन्नीतून विकली जात असल्याचा आरोप आहे. घातक केमिकलपासून तयार केली जाणारी ही दारू प्यायल्याने अनेक तरुणांचे लिव्हर निकामी झाले असून काहींना कायमचे अपंगत्व आल्याचे सांगण्यात येत आहे. रोज कमावणारा मजूर आपली सर्व कमाई दारूत खर्च करीत असल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहेत.

    अवैध सट्टा-मटका हा तालुक्यातील सर्वात घातक धंदा असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. यावल व फैजपूर शहरासह ग्रामीण भागात मोबाईलवर ऑनलाइन मटका तसेच कल्याण, मिलन आणि राजधानीसारखे सट्ट्याचे आकडे राजरोसपणे घेतले जात असल्याचे सांगण्यात येते. दिवसभर राबून कमावलेले पैसे तरुण काही क्षणांत सट्ट्यात गमावत आहेत. सट्ट्यात पैसे हरल्यानंतर काही तरुणांनी सावकारांकडून कर्ज घेतले असून, त्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनाही घडल्याचा दावा करण्यात येत आहे.

    इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे पोलिसांच्या मागे कसे सुरू आहेत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दर महिन्याला लाखो रुपयांचा हप्ता संबंधित विभागापर्यंत पोहोचत असल्याने या धंद्यांवर कारवाई होत नसल्याची चर्चा चावडी-चौकात सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गुटखा, दारू आणि मटका या तिन्ही अवैध धंद्यांचे एकच नेटवर्क असून त्याला राजकीय वरदहस्त असल्याचेही बोलले जात आहे.

    जनतेचा एल्गार; तात्काळ कारवाईची मागणी

    यावल तालुक्यातील सुज्ञ नागरिक, महिला बचत गट आणि युवक मंडळांनी अवैध धंद्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    १) तालुक्यातील सर्व अवैध गुटखा विक्रेते, पन्नी दारूच्या भट्ट्या आणि सट्टा-मटका अड्ड्यांवर जिल्हा अधीक्षकांच्या पथकाने थेट धाडी टाकून एमपीडीए व मकोका अंतर्गत कारवाई करावी.
    २) शाळा-महाविद्यालय परिसरात व्यसन विक्री करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करावेत.
    ३) या अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे.

    या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, जळगाव आणि पोलीस अधीक्षक, जळगाव यांना इशारा देण्यात आला आहे की, पुढील सात दिवसांत यावल तालुका अवैध धंद्यांपासून मुक्त झाला नाही, तर महिला आणि युवकांना सोबत घेऊन यावल पोलीस स्टेशन तसेच तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल.

    यावल तालुक्यातील तरुणाई वाचवायची असेल तर प्रशासनाने आता तरी जागे व्हावे, अशी मागणी तालुक्यातून होत आहे. अवैध धंद्यांमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले असून हातभट्टीच्या पन्नी दारूमुळे अनेक तरुणांचा मृत्यू झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विविध व्यसनांच्या आहारी जाऊन तरुणांचे मृत्यू होत असल्याने प्रशासनाने तात्काळ अवैध धंदे बंद करावेत, अशी जोरदार मागणी तालुक्यातून होत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    आकाशवाणी उड्डाणपुलावर तरुणावर काळाचा घाला

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif