Friday, December 9, 2022

सेनेस अजून एक धक्का; रामदास कदमांचा राजीनामा

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बंडखोरी नंतर सद्य परिस्थितीत सेनेला दिवसेंदिवस एकामागून एक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. आता नव्याने पुन्हा एकदा शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. रामदास कदम हे शिवसेनेतून बाहेर पडणार असल्याची माहिती होती. अखेर त्यांनी शिवसेनेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे.

- Advertisement -

रामदास कदमांना फडणवीस सरकारमध्ये मंत्री करण्यात आले. रामदास कदम यांचा मुलगा योगेश दापोलीतून आमदार आहे. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या गुवाहाटीला पोहोचलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता.

- Advertisement -

रामदास कदम हे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी मंत्री आहेत. शिवसेनेच्या नेतेपदाचा कार्यभार त्यांच्यावर सोपवला गेला होता. दरम्यान, कदम यांनी लवकरच पक्षाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं आणि अखेर त्यांनी राजीनामा दिलाय. रामदास कदम यांनी नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी राजीनामा सुपूर्द केलेला आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या