जळगावमध्ये घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद!

१२.५० लाख किमतीचे सोने-चांदी जप्त, रामानंद नगर पोलिसांची मोठी कारवाई

0

जळगावमध्ये घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद!

१२.५० लाख किमतीचे सोने-चांदी जप्त, रामानंद नगर पोलिसांची मोठी कारवाई

जळगाव प्रतिनिधी

शहरातील रामानंद नगर परिसरात एका बंद घरात झालेल्या १२.५० लाख रुपयांच्या घरफोडीप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून १५९.९२ ग्रॅम सोने आणि ४५० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. रामानंद नगर पोलिसांनी अत्याधुनिक तपास पद्धती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली.

फिर्यादी पराग जगन्नाथ चौधरी (वय ४८, व्यवसायिक, रा. रामानंद नगर, जळगाव) यांच्या बंद घरात ६ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १ ते ३ दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. कपाट आणि डब्यांमधून २२ तोळे सोने, ४५० ग्रॅम चांदीचे दागिने आणि १६,५०० रुपये रोख रक्कम चोरीला गेली. रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संशयिताचा शोध आणि अटक

पोलिसांनी घटनास्थळी आणि शहरातील विविध सीसीटीव्ही फुटेज तपासले.एका मोपेडस्वार व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या.चौकशीत तो जळगाव शहरातील नसल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांनी टोलनाक्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पारोळा टोलनाक्यावर तो दिसून आला. अधिक चौकशीत तो धुळे येथील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.

धुळे, अमळनेर, पारोळा परिसरात शोधमोहीम राबवून पोलिसांनी २८ नोव्हेंबर २०२४ रोजी आरोपीला ताब्यात घेतले. नाव साहिल प्रविण झाल्टे उर्फ साहिल शेख खलील शेख (वय २०, रा. पश्चिम हुडको, चाळीसगाव रोड, पवन नगर, धुळे) असे या आरोपीचे नाव आहे.

तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या घरातून चोरी केलेले चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. चोरीचे सोने साथीदारांच्या मदतीने वितळवल्याचे त्याने सांगितले.

त्याचे साथीदारही अटकेत

पवनराज संजय चौधरी (वय २८, रा. हत्ती गल्ली, पारोळा) सागर वाल्मीक चौधरी (वय ३०, रा. आझाद चौक, पारोळा) केशव बाळू सोनार (वय ३६, रा. शाहू नगर, अमळनेर) यांणी अटक करण्यात आली आहे.

आरोपीवर आधीपासून गंभीर गुन्हे दाखल
वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे, ता. मालेगाव, जि. नाशिक – भा.दं.वि. कलम ४५७, ३८० चाळीसगाव रोड पोलीस ठाणे, धुळे – भा.दं.वि. कलम ३०७, ३२४

ही यशस्वी कारवाई रामानंद नगर पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे, हवालदार जितेंद्र राजपुत, हवालदार इरफान मलिक, हवालदार सुशील चौधरी, हवालदार प्रवीण भोसले, नाईक देवानंद साळुखे, उमेश पवार, रवींद्र चौधरी, प्रवीण सुरवाडे यांनी तपासात मोलाची भूमिका बजावली.पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.