खा. रक्षा खडसेंनी ‘तिरंगा एक्सप्रेस’चे भुसावळ स्टेशनवर केले स्वागत…

 

भुसावळ, लोकशाही न्युज नेटवर्क;   

कोरोन काळापासून भुसावळ ते इगतपुरी धावणारी मेमू एक्स्प्रेस ही प्रवाश्यांसाठी बंद करण्यात आली होती. मात्र आता परिस्थिती पूर्व पदावर आली आहे. आणि सध्या ‘स्वातंत्राचा अमृत महोत्सव’ सुरु असल्याने त्याअंतर्गत भुसावळ रेल्वे विभागातून धावणाऱ्या या भुसावळ-इगतपुरी मेमू एक्सप्रेसचे नाव बदलून “तिरंगा एक्सप्रेस” म्हणुन सेवेत रुजू केले आहे. सदर “तिरंगा एक्सप्रेस” चे भुसावळ रेल्वे स्टेशन येथे खा. रक्षा खडसे, आ.संजय सावकारे व एडीआरएम  रुखमैय्या मीना यांच्यासह तिरंगा झेंडा दाखवत आज स्वागत केले.

तसेच “भुसावळ – इगतपुरी मेमू एक्सप्रेस” ह्या “तिरंगा एक्सप्रेस” मध्ये प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक या प्रवाशांशी संवाद साधून स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा देऊन तिरंगा ध्वज वितरीत केले. यावेळी खा.खडसे यांच्यासोबत आ.संजय सावकारे, एडीआरएम रुखमैय्या मीना, अडकम पाठक, अनिरुद्ध कुलकर्णी, भुसावळ प्रांत रामसिंह सुलाने, तहसीलदार.दिपक दिवरे, भुसावळ नगरपालिका मुख्य अधिकारी संदीप चिद्रवार, उपमुखधिकारी लोकेश ढाके, मंडळ अधिकारी एफ.एस.खान, तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष विनोद बारी, तलाठी पवन नवघडे, कर अधीक्षक परवेज अहमद, आस्थापना प्रमुख वैभव पवार तसेच भुसावळ नगरपालिका व रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here