गिरीश महाजन व नाथाभाऊंनी एकत्र यावे !

लवकरच पक्ष पक्षप्रवेशाचा निर्णय होणार, मंत्री रक्षा खडसे काय म्हणाल्या.. 

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

 

स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीने खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन या उपक्रम अंतर्गत आयोजित मुल्याकंन शिबीराच्या उदघाटन निमित्ताने रक्षा खडसे या जळगावात आल्या होत्या. यावेळी त्यांनी एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल मोठे विधान केले आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, आजही माझी इच्छा आहे की गिरीश महाजन व नाथाभाऊ यांनी एकत्र आले पाहिजे. दोघांनी एकत्र येऊन जिल्ह्याच्या विकासासाठी काम केल्यास नक्कीच चांगले राहील.

तसेच एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे व्यक्तिगत मत ते चांगले मांडू शकतील. लोकसभेच्या माझ्या विजयामध्ये एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा होता. केंद्राच्या नेत्यांकडून मला लोकसभेत सहकार्य करा, असं नाथाभाऊना सांगण्यात आलं होतं. त्यानुसार त्यांनी मदत देखील केली आहे. पण एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबतचा निर्णय हा वरिष्ठ पातळीचा असून याबाबतीत वरिष्ठ निर्णय घेतील. पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत हा विषय गेला असून यासंदर्भात लवकरच निर्णय होईल असे रक्षा खडसे म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.