केंद्रीय राज्यमंत्री खडसेंचा रेल्वे दुर्घटनेतील जखमींना दिलासा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे दुर्घटनेतील जखमींची गोदावरी हॉस्पिटल येथे भेट घेऊन आस्थेने चौकशी केली. त्यांनी जखमींच्या नातेवाईकांना भेटून दिलासा देत, ‘काळजी करू नका, शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जात आहे. जखमी लवकरच बरे होतील,’ असे सांगून त्यांच्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. केतकी पाटील, तहसीलदार नीता लबडे, सह-जिल्हा शल्यचिकित्सक आकाश चौधरी, तसेच गोदावरी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि पदाधिकारी उपस्थित होते. दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल व विघ्नहर्ता रुग्णालय येथे उपचार करण्यात आले होते. त्यानंतर सर्व नऊ जखमींना गोदावरी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. जखमींच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेत असल्याचे डॉ. केतकी पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना सांगितले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही श्रीमती खडसे यांना रेल्वे दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.