ऐनवेळी पवारांनी मतांचा कोटा बदलला; मुख्यमंत्र्यांची नाराजी – सूत्र

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असतांना मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टोकाचे मतभेद झाले असल्याचं राजकीय वर्तुळातील सूत्रांनी म्हटलंय. ऐन क्षणी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी मतांचा कोटा बदलला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय. 42 मतांचा कोटा शरद पवारांनी 44 केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापले असल्याची माहिती सूत्रींनी दिली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मतांचा कोटा बदलल्याने मुख्यमंत्र्यांचा प्रचंड संताप झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी एकूण सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण घडमोड समोर आली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या अवघे काही तास आधी कोटा बदलल्यानं शिवसेनेमध्ये तीव्र नाराजी आहेत.

राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी मतांचा कोटा बदललाय. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना गुरुवारी मतदानाची परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर मतांचं गणित बदललं होतं. एकूण 42 मतं राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदावाराला लागणार आहेत. 42 मतांचा कोटा ठरलेला असताना, तो 44 का केला गेला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शरद पवार यांनी मतांचा कोटा बदलल्यानं अनिल परब, अनिल देसाई, अरविंद सावंतांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. मिलिंद नार्वेकरांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here