Sunday, November 27, 2022

तब्बल 15 दिवसांनी राजू श्रीवास्तव शुद्धीवर

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

प्रसिद्ध सेलिब्रेटी राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीविषयी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून मृत्युशी राजुची झुंज सुरु होती. डॉक्टरांनी देखील चाहत्यांना आम्ही पूर्ण प्रयत्नाशी राजूला वाचविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते.

- Advertisement -

- Advertisement -

दुसरीकडे राजूच्या कुटूंबियांनी देखील सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन चाहत्यांना केले होते. बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी देखील राजूच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्याचे दिसून आले. त्यात बिग बी अमिताभ बच्चन यांची पोस्ट व्हायरल झाली होती.

पंधरा दिवसांनी राजुला शुद्ध आल्याची माहिती एएनआयनं दिली आहे. राजूच्या आरोग्याविषयी माहिती देणारं ट्विट व्हायरल झाले आहे. 10 ऑगस्टपासून राजु हा दिल्लीच्या एम्स रुग्णालामध्ये दाखल होता. त्याच्या आरोग्यात आता सुधारणा होत असल्याचे त्याचा पर्सनल सेक्रेटरी गर्वित नारंगनं सांगितलं आहे. त्यामुळे राजुच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या