Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»राजपाल यादव बिनधास्तपणे नाचताना दिसला!
    मनोरंजन

    राजपाल यादव बिनधास्तपणे नाचताना दिसला!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 20, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेता राजपाल यादवला जवळपास 11 ते 12 दिवस तिहार तुरुंगात राहावं लागलं. त्यानंतर कोर्टाने त्याला अंतरिम जामीन दिला. 9 कोटी रुपयांचं कर्ज न फेडल्यामुळे आणि चेक बाऊन्स झाल्यामुळे त्याला तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं होतं. मी एकटा पडलोय, माझ्याकडे पैसे नाही, माझे कोणी मित्रही नाहीत.. असं म्हणत तो तुरुंग अधिकाऱ्यांसमोर भावूक झाला होता. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी त्याच्या मदतीसाठी पुढे सरसावले होते. आता जामीनावर तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राजपाल यादव लग्नात बिनधास्तपणे नाचताना दिसतोय. पंधरा दिवसांपूर्वी रडणाऱ्या राजपालला आता खुशाल नाचताना पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत.

    भाचीच्या लग्नाचं कारण सांगून चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवला अंतरिम जामीन मंजूर केला होता. जामीन मिळाल्यानंतर राजपाल भाचीच्या लग्नात सहभागी झाला होता. लग्नातील कार्यक्रमात राजपालचा नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पत्नी आणि इतर कुटुंबीयांसोबत तो आनंदाने नाचताना दिसतोय. राजपालने भाचीच्या लग्नाच्या कार्यक्रमात सलमान खानच्या ‘सरकी जो सर से धीरे धीरे’ या गाण्यावर डान्स केला. यावेळी त्याने धोती-कुर्ता परिधान केला होता. यावेळी राजपालसोबत कुटुंबातील इतर महिलाही ठेका धरताना दिसत आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल त्याच्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवत आहे.

    सोशल मीडियावर पोस्ट

    तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपालने सोशल मीडियावर पोस्ट लिहित मदत करणाऱ्यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे, जर मी फसवणूक करणारा असतो तर गेल्या दहा वर्षांत मला बॉलिवूड इंडस्ट्रीत इतकं काम मिळालंच नसतं, असं त्याने स्पष्ट केलंय. या खटल्यात जर मी दोषी आढळलो, तर मी पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी तयार असल्याचंही राजपालने मान्य केलं. “इंडस्ट्रीला हे सिद्ध करण्याची गरजच नाही की ते माझ्यासोबत आहेत, कारण इंडस्ट्रीने कायम माझं समर्थन केलंय. मला पूर्ण विश्वास आहे की प्रत्येकजण माझ्यासोबत आहे. मला मिळालेल्या मदतीचा मी आदर करतो, परंतु मला सहानुभूती नकोय”, असंही राजपाल म्हणाला.

    Bollywood Cheque Bounce interim bail Loan Rajpal Yadav surrender Tihar Jail
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

    March 10, 2026

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.