काश्मीर, लोकशाही न्यूज नेटवर्क
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पीओकेवरून पाकिस्तानला मोठा इशारा दिला आहे. 9 व्या सशस्त्र दलाच्या माजी सैनिक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, पीओकेमध्ये दहशतवादी लाँचिंग पॅड आहेत. जर त्यांनी पीओकेमध्ये कार्यरत असलेले त्यांचे प्रशिक्षण शिबिरे आणि लाँचिंग पॅड बंद करावेत अन्यथा त्यांनी गंभीर परिणाम भोगण्यासाठी तयार राहावे. जम्मू- काश्मीरच्या अखनूर येथे माजी सैनिकांना संबोंधित करताना सरक्षण मंत्री म्हणाले की, पीओकेच्या भूमीचा वापर दहशतवादाला बळ देण्यासाठी केला जात आहे. आजही तिथे दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. सीमेलगतच्या भागात लाँच पॅड बांधण्यात आले आहेत. भारत सरकारला याची पूर्ण माहिती आहे. पाकिस्तानने हे नष्ट केले पाहिजे.
1965 मध्ये पाकिस्तानने बेकायदेशीर घुसखोरी आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिले. जम्मू काश्मीरमधील मुस्लिम लोकसंख्या पाकिस्तानी सैन्यासोबत उभी राहतील अशी त्यांना आशा आहे. पण येथील जनतेने त्यांना 1965 मध्ये पाठिंबा दिला नव्हता आणि दहशतवादाच्या काळातही पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही.अनेक मुस्लिम बांधवांनी दहशतवादाशी लढताना आपल्या प्राणाची आहुती दिली. ते पुढे म्हणाले की,पाकिस्तानने आजही दहशतवाद सोडला नाही. आजही 80 टक्क्याहून जास्त दहशतवादी पाकिस्तानातून भारतात येतात. सीमेवरील दहशतवाद 1965 मध्येच संपला असता, पण तत्कालीन केंद्र सरकार युद्धात प्राप्त झालेल्या सामरिक फायद्याला धोरणात्मक लाभात बदलण्यास असमर्थ राहिले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माजी सैनिक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला, तसेच त्यांनी जम्मूच्या अखनूर सीमावर्ती भागात 108 फूट उंच राष्ट्रध्वज फडकावला आणि एका ऐतिहासिक संग्रहालयाचे उद्घाटन केले. यावेळी संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल उपस्थित होते.
दहशतवाद संपवण्यास सुरुवात
ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करून आपण दहशतवाद संपवण्यास सुरुवात केली. आज येथील परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. पीओकेशिवाय जम्मू आणि काश्मीर अपूर्ण आहे. पीओके हा भारताचा मुकुटरत्न आहे. पाकिस्तानसाठी हा परकीय प्रदेशाव्यतिरिक्त काहीही नाही.