Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»“असभ्य देशाच्या हातात आण्विक शस्त्रे सुरक्षित आहेत का ?”
    राष्ट्रीय

    “असभ्य देशाच्या हातात आण्विक शस्त्रे सुरक्षित आहेत का ?”

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 15, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    श्रीनगर,लोकशाही न्युज नेटवर्क 

    ऑपरेशन सिंदूर’नंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या पहिल्या दौऱ्यात श्रीनगरमध्ये जवानांशी संवाद साधला.

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानमधील अण्वस्त्राच्या सुरक्षेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. पाकिस्तानमधील अण्वस्त्रांवर आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा संस्थेनं (IAEA) देखरेख ठेवावी. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांनी स्वत:ला कुठेही सुरक्षित समजू नये, हे या ऑपरेशननं स्पष्ट केलं आहे, असं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं.

    ते पुढे म्हणाले की, ‘मला संपूर्ण जगासमोर एक प्रश्न उपस्थित करायचा आहे की,’एका बेजबाबदार आणि असभ्य देशाच्या हातात आण्विक शस्त्रे सुरक्षित आहेत का?,’ पाकिस्तानच्या आण्विक शस्त्रांवर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) देखरेख ठेवावी.

     

    काय आहे IAEA ?

    IAEA ला ‘न्यूक्लियर वॉचडॉग’ म्हटले जाते. IAEA ही एक आंतरसरकारी संस्था आहे. अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापरला ती प्रोत्साहन देते. अण्वस्त्रांचा कोणत्याही लष्करी उद्देशांसाठी वापर रोखणे हे त्याचे ध्येय आहे. या संस्थेची स्थापना 1957 साली करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांच्या (UN) अंतर्गत जगातील ‘शांततेसाठी अणू’ संस्था हा IAEA च्या स्थापनेचा उद्देश होता.

     

    संरक्षण मंत्री श्रीनगरमध्ये

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एकूण सुरक्षा परिस्थिती, विशेषतः नियंत्रण रेषा (LOC) आणि आंतरराष्ट्रीय सीमेचा आढावा घेण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी सध्याच्या सुरक्षा परिस्थितीच्या विविध पैलूंवर संरक्षण मंत्र्यांना माहिती दिली. संरक्षण मंत्री श्रीनगरमधील भारतीय लष्कराच्या XV कॉर्प्समध्ये एकूण परिस्थिती तसेच आघाडीवरील सैनिकांच्या युद्ध तयारीचा आढावा घेतील.

     

    Defence Minister Rajnath Singh
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026

    ७१७ सरकारी दारूची दुकाने तातडीने बंद करा!

    May 12, 2026

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली सक्रिय

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif