Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»शेवटच्या सिनेमासाठी रजनीकांत यांचा मोठा निर्णय
    मनोरंजन

    शेवटच्या सिनेमासाठी रजनीकांत यांचा मोठा निर्णय

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 18, 2026Updated:February 18, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    साउथ सिनेविश्वाला जगभरात नवीन ओळख देणारे दिग्गज आणि लोकप्रिय सुपरस्टार रजनीकांत यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, सातासमुद्रा पार देखील फार मोठी आहे. गेल्या 5 दशकांपासून रजनीकांत त्यांच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर आणि रुपेरी पडद्यावर राज्य करत आहे. आज देखील त्यांच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत चाहते असतात. 2025 मध्ये रजनीकांत ‘कुली’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले. सिनेमात त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं सर्वच स्तरातून कैतुक देखील झालं. एका रजनीकांत त्यांच्या हीट सिनेमाच्या सिक्वलच्या कामात व्यग्र आहेत… लकरच रजनीकांत स्टारर ‘जेलर’ सिनेमा चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. एवढंच नाही तर, त्यांच्या आगामी सिनेमाच्या अपडेट येण्यास देखील सुरुवात झाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार रजनीकांत यांचा रिटायरमेंटचा कोणता विचार नाही आणि त्यांनी अशी कोणती इच्छा देखील व्यक्त केली नाही. पण त्यांच्या शेवटच्या सिनेमाबद्दल अपडेट्स येण्यास सुरुवात झाली आहे. अशी देखील माहिती समोर येत आहे की, रजनीकांत यांच्या शेवटच्या सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी त्यांची लेक सौंदर्य हिच्यावर असणार आहे.

    रिपोर्टनुसार, रजनीकांत त्यांच्या शेवटच्या सिनेमसाठी लेक सौंदर्या हिच्यासोबत कोलाबोरेट करणार आहेत. शेवटच्या सिनेमासाठी त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे… पण अद्याप हे ठरलेलं नाही की, त्यांचा शेवटचा सिनेमा कोणता असणार आहे. पण शेवटचा सिनेमा लक्षात राहिल असा बनवणार… या तयारीत रजनीकांत आहेत…

    रजनीकांत यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 75 व्या वर्षी देखील रजनीकांत ऍक्शन करताना दिसतात. 2025 मध्ये त्यांचा ‘कुली’ सिनेमा प्रदर्शित झालेला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली. पण परदेशात सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळाला. सिनेमात नागार्जुन देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. तर अभिनेता आमिर खान याने सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

    आता रजनीकांत ‘जेलर 2’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन नेसलन दिलीप कुमार यांनी केलं आहे. एवढंच नाहीतर, रजनीकांत अभिनेता कमल हासन यांच्यासोबत मोठ्या सिनेमाच्या देखील तयारीत आहे. सिनेमाला Thalaivar174xKH238 असं तात्पुरतं शिर्षक देण्यात आलं आहे.

    'Coolie' Movie 'Jailor' Movie Acting Fans India Legendary Popular Sequel South Cineworld Superstar Rajinikanth
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अल्पवयीन मुलीला डांबून ठेवत आळीपाळीने बलात्कार

    March 9, 2026

    हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहानाच्या घरावर गोळीबार

    March 9, 2026

    भारताला अमेरिकेकडून परवानगी घेण्याची काय गरज आहे?

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.