मोठी बातमी.. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

कल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये ‘उत्तर’ सभा घेतली. यावेळी राज ठाकरेंचा व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांना एक तलवार भेट देण्यात आली. राज ठाकरेंनी तलवार दाखवून तिचा स्वीकार केला होता. सार्वजनिक ठिकाणी शास्त्र बाळगणे, दाखवणे आणि उगारणे ही कलमे लावून राज ठाकरे, अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांनी घेतलेले उत्तर सभा चांगलीच चर्चेत आहे. राज यांनी या सभेत तलवार दाखवली होती. या प्रकरणी ठाणे येथील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मनसे नेते अविनाश जाधव आणि रविंद्र मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यावर आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘आज रोजी नौपाडा पोलीस स्टेशन हद्दीत 12 एप्रिलला गडकरी चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित जाहीर सभेदरम्यान अध्यक्ष राज ठाकरे यांनी तलवार दाखवली. या प्रकरणी त्यांच्यावर भा.द.वि कलम 34 सह भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 4 आणि 25 अन्वये अध्यक्ष मनसे राज ठाकरे, ठाणे आणि पालघर जिल्हा मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश अनंत जाधव आणि मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे आणि इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’

Leave A Reply

Your email address will not be published.