Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»रायसोनी महाविद्यालयात एकाच दिवशी ‘१८५ कॉपीराईट’ व ‘१७ पेटंट’ नोंद
    शैक्षणिक

    रायसोनी महाविद्यालयात एकाच दिवशी ‘१८५ कॉपीराईट’ व ‘१७ पेटंट’ नोंद

    जागतिक बौद्धिक संपदा दिनानिमित्त संशोधन व इनोव्हेशनचा नवा टप्पा; विद्यार्थी व प्राध्यापकांची उत्स्फूर्त कामगिरी
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 26, 2026No Comments149 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    मानवी बुद्धीमत्तेतून निर्माण होणाऱ्या सर्जनशील कल्पना, संशोधन व नवोपक्रमांना कायदेशीर संरक्षण देण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २६ एप्रिल रोजी ‘जागतिक बौद्धिक संपदा दिन’ साजरा केला जातो. याच औचित्याने या दिनाच्या पूर्वसंध्येला जळगाव येथील स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी एकाच दिवशी तब्बल १८५ कॉपीराईट आणि १७ पेटंट नोंदवून उल्लेखनीय कामगिरी करत संशोधन क्षेत्रातील आपली भक्कम छाप पुन्हा एकदा अधोरेखित केली.यावर्षी हा उपक्रम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल व इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल होत्या.

    कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी बौद्धिक संपदा हक्कांचे बदलते स्वरूप, त्याचे जागतिक महत्त्व आणि आधुनिक शिक्षण व्यवस्थेत त्याचे स्थान यावर सविस्तर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, आजच्या ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेत कल्पकता, संशोधन आणि इनोव्हेशन हेच प्रगतीचे खरे साधन बनले आहेत. जगातील विकसित राष्ट्रे ही पेटंट, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क यांच्या आधारे आपली आर्थिक व तांत्रिक प्रगती साधत आहेत. त्यांनी विविध देशांतील पेटंट व कॉपीराईट नोंदींची आकडेवारी सादर करत भारताची स्थिती स्पष्ट केली आणि भारतीय संशोधकांसमोर असलेल्या संधी व आव्हानांवरही प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष समस्यांवर उपाय शोधणारे प्रकल्प विकसित करावेत, त्यांचे दस्तावेजीकरण करावे आणि त्यांना बौद्धिक संपदा हक्कांतर्गत संरक्षण मिळवावे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.तसेच त्यांनी संस्थेत नोंदविण्यात आलेल्या १८५ कॉपीराईट व १७ पेटंट यांचे विश्लेषण करत विविध शाखांतील विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रकल्पांचे स्वरूप आणि त्यामागील नवकल्पना स्पष्ट केल्या. नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) संशोधनाभिमुख व कौशल्याधारित शिक्षणावर भर देण्यात येत असून, रायसोनी संस्थेत त्या दृष्टीने प्रभावी पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना स्टार्टअप, इनोव्हेशन आणि उद्योजकतेकडे वळविण्यासाठी IIC च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी “आयपी अँड स्पोर्ट्स – रेडी, सेट, इनोव्हेट” या संकल्पनेचे सखोल विश्लेषण करत बौद्धिक संपदा हक्कांचे व्यापक महत्त्व अधोरेखित करत नमूद केले की, आजच्या ज्ञानाधारित व स्पर्धात्मक युगात केवळ माहिती किंवा ज्ञान मिळवणे पुरेसे नसून त्या ज्ञानाचे नाविन्यपूर्ण कल्पनांमध्ये रूपांतर करून त्यातून मूल्यनिर्मिती करणे आवश्यक आहे. अशा कल्पनांना कायदेशीर संरक्षण मिळवून देणे ही काळाची गरज असून, बौद्धिक संपदा हक्क हे संशोधक, विद्यार्थी आणि संस्थांसाठी दीर्घकालीन प्रगतीचे प्रभावी साधन ठरतात. त्यांनी स्पष्ट केले की, बौद्धिक संपत्तीचे हक्क निर्मात्याला त्याच्या अविष्काराचे, विचारांचे आणि कलात्मक अभिव्यक्तीचे संरक्षण देतात, तसेच त्यातून आर्थिक लाभ मिळण्याची संधी उपलब्ध करून देतात. हे हक्क केवळ वैयक्तिक प्रगतीपुरते मर्यादित नसून देशाच्या आर्थिक व तांत्रिक विकासाचे महत्त्वपूर्ण मापदंड ठरतात. एखाद्या राष्ट्राच्या प्रगतीचा आलेख मोजताना त्या देशातील संशोधन, पेटंट नोंदी, कॉपीराईट्स आणि तंत्रज्ञान विकास यांना विशेष महत्त्व दिले जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी संशोधनाभिमुख दृष्टीकोन स्वीकारणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रायसोनी संस्थेत विद्यार्थ्यांना संशोधन, इनोव्हेशन व स्टार्टअप संस्कृतीसाठी पोषक वातावरण, अत्याधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात असल्याचे नमूद केले. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक तरी संशोधनाधारित प्रकल्प विकसित करून त्याचे पेटंट किंवा कॉपीराईट नोंदवावे, हीच आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    यावेळी त्यांनी संस्थेतील रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलच्या सातत्यपूर्ण व परिणामकारक कार्याचे विशेष कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष सुनील रायसोनी यांचेही या उपक्रमांना मिळणारे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच बौद्धिक संपदा हक्क हे देशाच्या आर्थिक विकासाचे प्रभावी साधन असून, भारताला जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेण्यासाठी युवा संशोधकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले.

    या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रांतील प्रकल्प, सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन्स, वेब सिस्टिम्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आयओटी, सायबर सुरक्षा तसेच शैक्षणिक साहित्य आदींवर कॉपीराईट नोंदविण्यात आले, तर तांत्रिक नवकल्पनांवर आधारित पेटंटही दाखल करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वय मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख व रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे डीन प्रा. डॉ. मुकुंद पाटील यांनी साधले,

    या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड वाढीस लागली असून, बौद्धिक संपदा हक्कांविषयी जागरूकता निर्माण होऊन नवोपक्रमाला चालना मिळत आहे. रायसोनी संस्थेची ही कामगिरी भविष्यातही संशोधन क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करणारी ठरेल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष सुनील रायसोनी यांनी व्यक्त केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif