Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    ताज्या बातम्या

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 16, 2026No Comments186 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आवाहन : अधिक्षकांच्या दरबारी रिल्स स्टार

    जळगाव – जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आज सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रभाव निर्माण करणाऱ्या रिल्स क्रिएटर्सची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. समाजामध्ये कायद्यांविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि नागरिकांनी गुन्हेगारीपासून सतर्क राहावे, या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली.
    बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी उपस्थित रिल्स स्टारशी संवाद साधत समाजोपयोगी विषयांवर प्रभावी रील्स तयार करण्याचे आवाहन केले. विशेषतः तरुण वर्ग सोशल मीडियाशी मोठ्या प्रमाणावर जोडला गेल्याने योग्य संदेश देण्यासाठी रील्स हे प्रभावी माध्यम ठरू शकते, असे त्यांनी सांगितले. यावेळी फेटल अपघात व वाहतूक नियमांचे पालन, पॉस्को कायद्याबाबत माहिती, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, महिलांविषयक गुन्हे व कायदेशीर संरक्षण या महत्त्वाच्या विषयांवर जनजागृतीपर रील्स तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
    बैठकीस जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रसिद्ध रिल्स क्रिएटर्स उपस्थित होते. त्यामध्ये अमित माळी, संघपाल तायडे, सुरेश राजपूत, समृद्धी पाटील, तन्वी पांडव, भाग्यश्री पाटील, याशिका किनाडा, तेजस्विनी देशमुख, अक्षय नेहते, पवन भोई, आदित्य संभाजी पाटील, ऋषिकेश पवार, हरीदास बोंडे, अजय कुमावत, महेश सुर्वे, निवृत्ती इंगळे आदींचा समावेश होता. पोलीस प्रशासन आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी एकत्र येऊन समाजहितासाठी काम करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. समाजामध्ये सकारात्मक संदेश पोहोचवून गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif