Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»हवामान»लवकरच होणार पावसाची सुरुवात : सांगावा आला
    हवामान

    लवकरच होणार पावसाची सुरुवात : सांगावा आला

    ‘या’ काळात अंदमान, निकोबार बेटांवर मान्सून होणार सक्रिय
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 3, 2026No Comments836 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    भारतीय हवामान विभागाने मोठी आनंदवार्ता दिली आहे. अल निनोमुळे यंदा सूर्य आग ओकत आहे. तर पाऊस लांबण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण या सर्वांचे मळभ झटकून पावसाचा सांगावा आला आहे. आयएमडी  नुसार दक्षिण-पश्चिम मान्सून हा त्याच्या निर्धारीत प्रवास लवकर पूर्ण करणार आहे. तो जून महिन्याच्या सुरुवातीलाच केरळम राज्यात दाखल होणार आहे. अर्थात यंदा पावसावर अल निनोचे सावट आहे. अल निनोमुळे पावसाचा जोर कमी असेल. पण पाऊस उशीरा येणार नाही हा मोठा दिलासा आहे. तर युरोपातील काही हवामान संस्थांनी भारतात मान्सून हा जून महिन्यात दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे.

    आयएमडीचे महा संचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी सांगितले की, 14 ते 20 मे दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून सक्रिय होईल. या पट्ट्यात जोरदार पाऊस कोसळेल. सरकारी आकडेवारीनुसार हा परिसर देशात मान्सूनचा सांगावा आणण्याचे काम करतो. इथून मान्सून सक्रिय होत तो केरळम राज्यात दाखल होतो आणि मग भारतभर पोहचतो.

    अल-निनो सक्रिय होण्याची चिंता सुद्धा आहे. आयएमडी  नुसार दीर्घकालीन पूर्वअंदाजानुसार जून ते सप्टेंबर या महिन्यात नियमित पावसापेक्षा यंदा पर्जन्यमान कमी असेल. सध्या अल निनोची भीती असली तरी भारतावर त्याचा मोठा प्रभाव अद्याप दिसलेला नाही.जुलै महिन्यात अल निनो भारतात कहर दाखवण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी जुलै महिन्यात मान्सूनला फटका बसू शकतो.

    आयएमडी  ने मे 2026 साठी जो पूर्वअंदाज वर्तवला आहे, त्यात देशभरात काही भागात मुसळधार पाऊस पडेल. नेहमीच्या पावसापेक्षा हे प्रमाण 110% जास्त असेल. ॲग्रोकेम फेडरेशन ऑफ इंडियाचे महासंचालक कल्याण गोस्वामी यांनी मे महिन्यात चांगला पाऊस झाल्याने जमीन भूसभूशीत होण्यास मदत होईल असे म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करण्यास उपयुक्त वातावरण तयार होईल. तरीही शेतकऱ्यांनी जून महिन्यातील पावसाचा अंदाज घ्यावा आणि दुबार पेरणीचे संकट ओढावणारी यासाठी माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. 15 मेपर्यंत मान्सून सक्रीय होण्याची दाट शक्यता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा

    September 6, 2026

    जळगाव जिल्ह्यात २ ते ६ सप्टेंबरदरम्यान हलका ते मध्यम पाऊस

    September 2, 2026

    महाराष्ट्रात आज ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस

    August 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif