Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»हवामान»जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    हवामान

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    १२ ते १५ सप्टेंबरदरम्यान जोरदार सरींची शक्यता : हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 11, 2026No Comments394 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसह राज्यातील विविध भागांत १२ ते १५ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे. या कालावधीत काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याचे संकेत आहेत. काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

    जळगाव वेदरच्या माहितीनुसार, काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसासोबतच वीज आणि वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    ११ सप्टेंबर रोजी नाशिक घाट परिसरासह परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या भागांत पावसासह वादळी हवामानाची शक्यता आहे. १२ सप्टेंबर रोजी धुळे, जळगाव, नाशिक घाट, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

    १३ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा घाट, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. १४ सप्टेंबर रोजी नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागांत पावसाच्या सरींसह काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

     ‘यलो अलर्ट’ असलेल्या जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी हवामानातील बदलांकडे लक्ष ठेवावे. वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होत असताना मोकळ्या परिसरात जाणे टाळावे तसेच झाडे, विजेचे खांब आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif