परभणी, लोकशाही न्युझ नेटवर्क
राज्यात आज पासून पावसाचा जोर पुढील काही दिवसांसाठी वाढणार आहे. आज पासून विदर्भा कडून पाऊस सुरू होईल, तो 27 ऑगस्ट पर्यंत राज्यातील प्रत्येक गावात दोनदा हजेरी लावणार आहे. धरण क्षेत्रात देखील पाऊस वाढेल असा पाऊस होणार असल्याची माहिती जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिली आहे.
दरम्यान मुंबई, नाशिक, पुणे, नगर, उत्तर महाराष्ट्रात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून उर्वरीत राज्यात देखील जोरदार पाऊस पडणार आहे. आजपासून विदर्भा कडून, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण असा प्रवास करत पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे. आजपासून 23, 24, 25, 26, 27 ऑगस्ट राज्यात चांगले पाऊस पडणार असून 28, 29, 30 ऑगस्ट पुन्हा सुर्यदर्शन होणार आहे. दरम्यान ढगाळ वातावरण देखील राहण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तविली आहे.
त्यानंतर 31 ऑगस्ट व 1, 2, 3 सप्टेंबर पुन्हा जोरात राज्यात पाऊस पडणार आहे. मात्र शेवटी हे अंदाज आहेत. वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते, अशी माहिती पंजाब डख हवामान अभ्यासक, मु. पो. गुगळी धामणगाव, ता. सेलू, जि. परभणी यांनी दिली.