Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»पावसाने मारली दडी, शेतकऱ्यांची चिंता वाढली!
    संपादकीय

    पावसाने मारली दडी, शेतकऱ्यांची चिंता वाढली!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 17, 2026No Comments144 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    गेले दहा दिवस झाले, जळगाव जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. त्याआधी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याने खरिपाच्या पेरण्या आटोपल्या. परंतु, गेल्या दहा दिवसापासून पाऊसच नसल्याने ज्या पेरण्या झाल्या होत्या, त्यातील पिकांनी आता माना टाकल्या असून ते सुकायला सुरुवात झाली आहे. एक-दोन दिवसांत पाऊस नाही आला, तर पिके करपून जातील, पेरलेले बियाणे वाया जाईल, दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहील. एकूण खरिपाच्या 50% पेरण्या जळगाव जिल्ह्यात पूर्ण झाल्या आहेत. एक-दोन तालुके वगळता इतर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही. नदी, नाले, ओढे काठोकाठ भरून काय झालं, ते आता वाहण्याची अपेक्षा असताना तसे होताना दिसत नाही. असे असले, तरी पेरणीलायक पाऊस झाला म्हणून शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. आता पावसाची अत्यंत गरज आहे. या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात पाऊस पडला नाही, तर पूर्णपणे दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. त्यानंतर जर पाऊस आला, तर खरिपाचे पीक उत्तमपणे येणार नाही. पिकाचे उत्पन्न जेमतेम राहील, पिकाची वाढ खुंटलेली असेल.

    आता ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या आहेत, त्या ठिकाणचे बियाणे वाया गेल्याने नवीन बियाणे घेऊन त्याला नव्याने पेरणी करावी लागणार आहे. शासन नवीन बियाणे घेण्यासाठी मदत करेल, पण त्यासाठी जी याचना शेतकऱ्यांना करावी लागते, ती वेगळीच राहणार आहे. आधी घेतलेल्या बियाण्याने तो आधीच चिंतेत आहे. आता नव्याने बियाणे घ्यायचे आणि त्याची पेरणी करायची म्हटली, म्हणजे द्राविडी प्राणायाम शेतकऱ्यांसमोर उभा ठाकणार आहे. बरे, आजकाल बियाण्याची गॅरंटीही देता येत नाही. पेरलेले बियाणे चांगले उगवेलच, याची खात्री नाही. अनेक प्रकारच्या बियाण्यांची बोगस बियाणे म्हणून ख्याती झालेली आहे. त्यामुळे सध्या शेतकरी वेगवेगळ्या कात्रीत सापडला आहे.

    एक तर पाऊस अनियमित पडतो आहे. पडणारा पाऊस अपुरा असून तो समाधानकारक नाही. पाऊस थोडासा पडला, तर त्याला कसेबसे पेरणी उरकून घेण्याच्या परिस्थितीत शेतकरी असतो. पेरल्यानंतर पुन्हा पावसाची वाट पाहत राहणे त्याच्या नशिबी आले आहे. मग धाकधूक राहते की, आता पाऊस नाही आला, तर पिके करपण्याची भीती आहेच. मग पिके करपली की, नव्याने पेरणी करण्याचा घाट घालावा लागतो. मग नवीन बियाणे घेण्यापासून खते घेण्यापर्यंत सर्व सोपस्कार त्याला करावे लागतात. या दुष्टचक्रामध्ये शेतकरी सापडला आहे. हे त्याचे दुष्टचक्र कधी संपत नाही. त्या दुष्टचक्राच्या फेऱ्यांमध्ये सतत तो अडकलेला असतो. मग शेवटी नापिकी झाली, पीक नाही आले, की कर्जबाजारी होऊन जातो व डोक्यावर कर्ज झालेला शेतकरी कर्जामुळे आत्महत्येसारखी वाट धरतो. हे दुष्टचक्र कोरडवाहू शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे.

    वर्षभर काबाडकष्ट करून वर्षाच्या शेवटी त्याच्या हाती काहीच येत नसल्याने खायचे वांदे होतात. मुलाबाळांचे शिक्षण असते. ते करण्यासाठी त्याच्याजवळ पैसे नसतात. तो उसनवार घेऊन किंवा कर्ज काढून मुलाबाळांना शिकवतो. त्यातच एखाद्या मुलीचे अथवा मुलाचे लग्न आले, तर ते करण्यासाठी त्याच्याजवळ पैसा नसल्याने तो आणखी कर्ज काढतो. हे कर्ज सावकाराकडूनच हव्या त्या व्याजाने काढावे लागते. त्या कर्जाचे हप्ते फेडता फेडता त्याला नाकी नऊ येतात. हप्ते फेडता येत नसल्याने त्या हप्त्यावरही चक्रवाढ व्याज आकारले जाते. ते कर्ज घेतल्याच्या दुपटीने वाढते. मग त्याला ते कर्ज फेडण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्या कराव्या लागतात. एकाचे कर्ज फेडण्यासाठी पुन्हा दुसऱ्याकडून कर्ज घ्यावे लागते, म्हणजे कर्जावर कर्ज असे होते. त्यातूनच त्या कर्जातून त्याची सुटका होत नाही. तो कर्जात बुडून जातो. हे कर्ज फेडता येत नाही म्हणून शेवटी तो आत्महत्येचा मार्ग अवलंबतो. अशा प्रकारे आत्महत्या वाढत जातात. शेतकरी आत्महत्या काही थांबतच नाहीत.

    एक काळ असा होता की, भारतातील शेतकरी समृद्ध होता. त्याचे कारण म्हणजे पावसाळा मुबलक होता. आता हवामानाच्या बदलानुसार किंवा त्याच्या लहरीप्रमाणे शेतकऱ्याला वागावे लागते. कमी पावसामुळे शेतकऱ्याकडील जनावरांची संख्याही कमी झाली आहे. गाई, म्हशींची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्याचा परिणाम दुधावर झाला असून कमी प्रमाणात दूध येते. त्यामुळे घरी दूध खाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. दुधापासून दही, ताक, लोणी, तूप आदी वस्तू आता मुबलकपणे होत नाहीत. त्यामुळे सकस खाण्यापासून शेतकरी कुटुंब वंचित राहिले आहे. मोठ्या प्रमाणात गाई, म्हशी, बैल आदींची संख्या घटल्याने त्यांच्या शेणापासून जे सेंद्रिय खत तयार व्हायचे, ते आता होईनासे झाले आहे. त्यामुळे स्वतःच्या शेतात सेंद्रिय खताचा वापर मुळीच होत नाही. त्याची जागा रासायनिक खतांनी घेतली आहे. एकतर रासायनिक खते महाग मिळतात आणि रासायनिक खतामुळे जमिनीची जी प्रत आहे, ती खालावते. जमिनीची पोत कमी होते. जमीन काही वर्षांनंतर रासायनिक खतामुळे नापीक होते. त्यात पीकच येईनासे होते. त्यामुळे जमिनीत उत्पन्न कमी येते. अशा प्रकारे हे जमिनीचे दुष्टचक्र शेतकऱ्याच्या नशिबी आलेले आहे. शेतात सेंद्रिय खत वापरले, तर त्यातून उत्पन्न तरी वाढते, पण सेंद्रिय खत आता नावालाच वापरले जाते. अशा प्रकारची अवस्था झाली आहे. काही झाले, तरी पावसावर अवलंबून असलेली शेती आता बेभरवशाची झाली आहे. पावसाच्या लहरीप्रमाणे शेतकऱ्यांना वागावे लागते. हे दुष्टचक्र केव्हा संपेल, त्याची वाट शेतकरी पाहत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!

    September 16, 2026

    गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!

    September 15, 2026

    लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!

    September 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif