Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»पावसाचा कहर : घरात पाणी; अनेक दिवसापासून वीज गायब
    महाराष्ट्र

    पावसाचा कहर : घरात पाणी; अनेक दिवसापासून वीज गायब

    अतिवृष्टीचा जोरदार फटका : लोकांचा रस्त्यावर उतरून संताप
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 8, 2026No Comments270 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    गेले तीन ते चार दिवसापासून मुसळधार पावसाने वसई – विरारमध्ये थैमान घातले आहे. नालासोपारा पूर्व मोरेगाव परिसरामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून वीज नसल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. नालासोपारा येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला आहे.

    नालासोपाऱ्यात साचलेल्या पाण्यामुळे एका गर्भवती महिलेला देखील फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे नालासोपारा शहरात साचलेल्या पाण्यात रुग्णवाहिका न मिळाल्याने नातेवाईकांनी या गर्भवती महिलेला ट्रॅक्टरमधून रुग्णालयात नेले. या घटनेमुळे येथील विदारक स्थिती समजू शकते.

    विरार पश्चिम येथील रश्मीनगरामधील भद्रा सोसायटीत तळमजल्यातील घरात पाणी साचले. यात सुभाष पानसरे यांच्या घरात पाच दिवसापासून पाणी साचल्याने सर्व इलेक्ट्रिक वस्तूचे नुकसान झाले आहे. गेले अनेक दिवस लाईट नाही, मोबाईल नेटवर्क नाही, त्यामुळे येथील नागरिकांचा जगाशी संपर्क तुटला आहे. विरार पश्चिम रश्मी नगर मधील भद्रा सोसायटीत तळमजल्यातील घरात पाणी साचले होते. सुभाष पानसरे यांच्या घरात पाच दिवसापासून पाणी साचल्याने सर्व इलेक्ट्रिक वस्तूचे नुकसान झाले आहे.घरात लाईट नाही, मोबाईल नेटवर्क नाही, त्यामुळे सर्वांचा संपर्क तुटला आहे.

    विरार पश्चिम रश्मी नगर मधील रेवा अपार्टमेंट मधील देखील हेमलता शेटगीर यांच्या घरात गेल्या चार दिवसापासून पाणी साचले आहे.या घरात तीन जण राहात आहेत. त्यातील दोघेजण वयस्कर आहेत, तर एक मुलगी आहे. रविवारपासून घरात पाणी साचल्याने घरात लाईट नाही, मोबाईल नेटवर्क नाही, पिण्याचे पाणी नाही त्यामुळे त्यांचे हाल सुरू आहेत. या घरातील सर्व सामान या रहिवाशांनी उंचीवर ठेवले आहे. परंतू अजूनही येथे कोणीही मदतीला आले नाही असा आरोप त्यांनी केला आहे.

    विरार पश्चिम येथील एमबी इस्टेटमधील दत्त नगर रोड, मस्जिद गल्ली अजूनही पाण्याखाली आहे. आज पाचव्या दिवशी ही रस्त्यावर गुडघा ते कंबर इतके पाणी तुंबलेले आहे, येथे आजूबाजूच्या सोसायटी मध्येही पाणी साचले आहे. त्यामुळे रहिवाशांचे प्रचंड हाल सुरू असताना कोणताही लोकप्रतिनिधी येथे .फिरकलेला नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना

    September 13, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif